ग्राहक म्हणून आली आणि हातसाफ करून गेली; सराफा दुकानदाराला तीन लाखांचा चूना

योगेश बरवड
Saturday, 17 October 2020

चंद्रपूरच्या राहणाऱ्या प्रेमेश्वरी गाडे (४१) यांना ओमेगा रुग्णालयात जायचे असल्याने शुक्रवारी सकाळी त्या बसने नागपुरात आल्या. अजनी चौकातील बसस्टॉपवर उतरल्यानंतर बॅग चेक केली असता ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग चोरी गेल्याचे लक्षात आले. शेजारी बसलेल्या महिलेने नजर चुकवून बॅग लांबविल्याचा कयास लावला जात आहे.

नागपूर : ग्राहक बनून आलेल्या चोरटीने संधी मिळताच सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. पाचपावली हद्दीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यासह शहरात चोरीच्या एकूण तीन घटना उघडकीस आल्या आहेत.

महाल येथील रहिवासी प्रदीप कोठारी यांचे कमाल चौकात आंबेडकर रोड पोस्ट ऑफिससमोर गिरनार ज्वेलर्स नावाने प्रतिष्ठान आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुकानात असताना एक ४५ वर्षे वयोगटातील महिला आली. तिच्या मागणीनुसार प्रदीप यांनी दागिने दाखविले.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

थोड्याच वेळात दागिने पसंत नसल्याचे कारण देत महिला खरेदी न करताच निघून गेली. सामान पुन्हा व्यवस्थित ठेवत असताना काही दागिने गहाळ दिसले. व्यवस्थित पाहणी केली असता सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने गहाळ दिसले. महिलेने हातचलाखीने हे दागिने लांबविले.

चंद्रपूरच्या राहणाऱ्या प्रेमेश्वरी गाडे (४१) यांना ओमेगा रुग्णालयात जायचे असल्याने शुक्रवारी सकाळी त्या बसने नागपुरात आल्या. अजनी चौकातील बसस्टॉपवर उतरल्यानंतर बॅग चेक केली असता ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग चोरी गेल्याचे लक्षात आले. शेजारी बसलेल्या महिलेने नजर चुकवून बॅग लांबविल्याचा कयास लावला जात आहे.

नवीन कामठी हद्दीत घरफोडीची घटना पुढे आली. लोकविहार, ऑरेंज सिटी पार्क येथील रहिवासी आशीष भंदारवार (३५) हे गुरुवारी रात्री घराला कुलूप लावून सहपरिवार नंदनवन येथे राहणाऱ्या भावाकडे गेले होते. चोरट्याने संधी साधून घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी व लोखंडी आलमारीतील दागिने सोबत घेतल्यानंतर पार्किंगमधील दुचाकीही चोरून नेली.

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी चिखली चौकात घडली. प्रीती मेश्राम (३४, रा. पंचशीलनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. आरटीओतील काम करण्यासाठी त्या संतोष सहारे (७२, रा. पाटील ले-आउट, भीलगाव) यांच्या गाडीवर बसून जात होत्या. चिखली चौकात लाल सिग्नल असल्याने ते थांबले. शेजारीच कंटेनरही उभे होते. सिग्नल सुटताच कंटेनर चालकाने वाहन वेगात पुढे काढण्याचा प्रयत्न केला. यात दुचाकील धडक बसून प्रीती गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवीत पुढील कारवाई सुरू केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh lime to the bullion shopkeeper