एका ठाणेदाराच्या समाजकार्याची शहरभर चर्चा! 

Inspector of Police provide meals for thirteen thousand poor
Inspector of Police provide meals for thirteen thousand poor
Updated on

नागपूर : कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसतो आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या घरात चूल पेटत नसल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने गरिबांवर ओढवलेला प्रसंग ओळखून दोन वेळेसचे जेवण उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला आणि पाहता पाहता एका दिवसात 13 हजारांपेक्षा जास्त लोक ठाणेदाराने उभारलेल्या "पोलिस किचन'मध्ये जेवन करताहेत. ही किमया साधणाऱ्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे हेमंतकुमार खराबे. 

दुसऱ्या राज्यातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात नागपुरात कामगार म्हणून आहे. तसेच अनेकांचा उदरनिर्वाह "हातावर कमावणे आणि पानावर खाणे' असा आहे. दोन वेळेसच्या जेवनाची सोय करण्यासाठी अनेकांना सकाळी कामावर जावे लागते तेव्हा सायंकाळी त्यांच्या घरातील चूल पेटते. कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू झाल्याने मजूर आणि गरिबांचे आबाळ झाले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी गरिबांवर आलेल्या संकटावर मात करण्याचा संकल्प केला. 

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि पोलिस उपायुक्‍त विवेक मासाळ यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून दोन वेळेसचे जेवन बनविण्यासाठी "पोलिस किचन' तयार केले. सुरुवातील स्वतःच्या पैशातून जेवण तयार करून झोपडपट्टी, वस्त्या आणि खेळे गाठणे सुरू केले. तेथे पोलिसांचे वाहन बघताच धांदल उडाली. मात्र, त्यांनी लगेच पोलिस वाहनावरील स्पिकरमधून सर्वांना विनंती केली आणि जेवण वितरण करणे सुरू केले. 

खराबे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाची पोलिस दलात आणि शहरभरात चांगलीच चर्चा झाली. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून मदतीसाठी फोन येणे सुरू झाले. त्यांना भोजनदानासाठी आर्थिक मदत देण्यासाठी स्वतःहून दानदाते समोर येत होते. मात्र, त्यांनी आर्थिक मदत स्वीकारण्यास नकार देत केवळ गहू, तांदूळ, खाद्यतेल, दाळ, तिखट-मीठ अशा वस्तू स्वीकारण्याची तयारी दर्शविली. आज खराबे यांच्या प्रयत्नामुळे पोलिस किचनची संकल्पना शहरातील विविध भागांमध्ये राबविण्यात येत आहे. 

राजकीय नेते, नगरसेवक, संस्थांचे पदाधिकारी आणि संघटनेचे तथाकथित कार्यकर्त्यांनी खराबे यांच्याकडून प्रेरणा घेत झोपडपट्टी आणि खेळ्यात अशी व्यवस्था करावी. आज खराबे यांच्या कार्याची दखल सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांनी घेतल्यामुळे त्यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली. खराबे यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक पोलिस अधिकारी सरसावले आहेत. 

1,800 कुटुंबांना "फूड किट्‌स'

दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, खाद्यतेल आणि तिखट-मीठ अशा सामुग्रीचे पाकिट (फूड किट्‌स) बनविण्यात आले. आतापर्यंत पीआय खराबे यांनी 1,800 कुटुंबांपर्यंत फूड किट्‌स पोहोचवल्या आहेत. आता झोपडपट्टी आणि खेड्यांमध्ये पोलिसांचे वाहन दिसताच भीती वाटण्याऐवजी चेहऱ्यांवर हास्य उमटत आहे. 

अन्न-धान्य मुबलक प्रमाणात मिळाले 
"मैं अकेला चला था... मंजील की ओर, लोग जुडते गये... कारवां बनता गया...' त्यामुळे एवढ्या चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी नियोजन केले नाही. गस्तीवर बाहेर निघताना अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे लक्षात आले. त्यामुळे मन हेलावून गेले. लगेच मनात विचार आला की यांच्यासाठी जेवनाची व्यवस्था करावी. पत्नीला फोन केला. घरीच जेवण तयार करण्यास सांगितले. तीन तासांत पुन्हा जेवण घेऊन वितरित करण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. आता दानदात्यांकडून अन्न-धान्य मुबलक प्रमाणात मिळाले. कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही, याची खात्री आहे. याचे सर्व श्रेय मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक देवदूताला जाते. 
- हेमंतकुमार खराबे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस स्टेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com