जलशुद्धीकरण केंद्रात भ्रष्टाचार

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 26 January 2021

रामटेक तालुक्यातील बोरी गटग्रामपंचायतीमध्ये तीन जलशुद्धीकरण केंद्र लावण्यात आले. प्रति जलशुद्धीकरण २० लाख रुपयेप्रमाणे कंत्राट देण्यात आले.

नागपूर : ग्रामपंचायतीमध्ये लावलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चौकशी होणार आहे. चौकशी पूर्ण होतपर्यंत कंत्राटदाराचे बिल अदा न करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिले. 

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

रामटेक तालुक्यातील बोरी गटग्रामपंचायतीमध्ये तीन जलशुद्धीकरण केंद्र लावण्यात आले. प्रति जलशुद्धीकरण २० लाख रुपयेप्रमाणे कंत्राट देण्यात आले. काँग्रेस सदस्य दुधाराम सव्वालाखे यांनी यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लावून याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे केली होती. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सव्वालाखे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जलशुद्धीकरण केंद्राची (आरो प्लांट) किंमत १० लाख रुपये असून कंत्राट २० लाखांचे देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात अडकले पर्यटन; चारऐवजी सहा पर्यटकांना भ्रमंतीच्या परवानगीची प्रतिक्षा

कंत्राटदाराने जुन्याच प्लांटच्या साहित्याचा वापर केला. हे लक्षात आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने साहित्य परत नेले. याची तक्रार पाणीपुरवठा विभागाकडे केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. सव्वालाखे यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेत उपस्थित केला. अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमताने हा सर्व गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी लावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three water purification centers were set up at Bori Gatgram Panchayat in Ramtek taluka