नागपूर : चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. यामुळे पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या चीनमधील नागरिकांची संख्या कमी झाली आहे. तसेच भारतातून इतर देशांत जाणाऱ्या पर्यटकांची संख्येवरही परिणाम झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. कोरोना विषाणूची लागण आता युरोपातही होऊ लागल्याने अनेकांनी तिकडे जाण्याचे बेत रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.
अवश्य वाचा - थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर चढवली व्हॅन
दरवर्षी फेब्रुवारी ते मे कालावधीत चीनमधील हजारो पर्यटक भारतात पर्यटनासाठी येत असतात. या संख्येत घट झाली आहे. सध्या नागरिकांकडूनच आरक्षण रद्द केल्या जात आहे. चीनला जाणारी आणि तिथून येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर हॉंगकॉंग, मकाऊ, सिंगापूर, कंबोडियामधून भारतात येणाऱ्या पर्यटकांचीही कठोर तपासणी केली जात आहे. केवळ चीनमधूनच नव्हे, तर संपूर्ण आशियातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व आशियातील पर्यटकांची संख्या घटली आहे. केवळ भारतात येणारे पर्यटकच नव्हे तर, भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्येही "कोरोना'ची दहशत आहे. पाच ते सहा महिने अगोदर आरक्षण केलेल्या पर्यटकांकडून आरक्षण रद्द करण्यात येत आहे. ऐनवेळी आरक्षण रद्द केल्याने विमान कंपन्यांकडून पूर्ण रक्कम परत मिळत नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. एकूणच भारतातील पर्यटनावर यामुळे अधिक परिणाम झाला आहे.
याबद्दल नोवा ट्रॅव्हल्सचे संचालक मनविंदर तुली म्हणाले, विदर्भासह मध्यभारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंगापूर, मलेशिया, सिंगापूर आणि मकाऊ या देशात जातात. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोना विषाणूने जगात हैदोस घातला आहे. त्याचा फटका यादेशातील पर्यटनाला पहिल्या टप्प्यात बसला होता. आता युरोप पर्यटनालाही फटका बसू लागला आहे. अनेकांनी आपले टूर रद्द केलेले आहेत.
जॅक्सन ट्रॅव्हल्सचे संचालक सुनील काशिकर म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात विदेशात जाणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात बुकिंगही सुरू झाले होते. अचानकच कोरोना विषाणूचा उद्रेक वाढला आणि पर्यटनासह सर्वच व्यवसायाला फटका बसू लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.