पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी गेले जंगलात अन्‌...

The tourists who went for tourism were disappointed
The tourists who went for tourism were disappointed

नागपूर : मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा-अंधारी, बोर व्याघ्र प्रकल्पात सलग दोन दिवस वन्यप्राण्यांसह वाघांचे दर्शन होत असल्याने वन पर्यटनाला आलेल्यांमध्ये उत्साह होता. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने जंगलात नववर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. एक जानेवारीला सकाळी वनपर्यटनाला जंगलभ्रमंतीसाठी गेलेल्या पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन न झाल्याने अनेकांच्या पदरी निराशा आल्याने अनेकांनी नशिबाला कोसले.

30 डिसेंबरला रविवारी सकाळी मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवसानंतर नऊ वाघांसह एकाच हरणाच्या मागे दोन वाघांनी केलेला पाठलाग या व्हायरल झालेल्या चित्रफितीमुळे तुरीया प्रवेशद्वारावरून जंगलभ्रमंतीसाठी गेलेल्यांच्या पर्यटकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. सकाळी आणि सायंकाळी दोन्ही सफारीला वाघाचे हमखास दर्शन झाले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र पेंचमधील खुर्सापार आणि सिल्लीरी या दोन्ही जंगलात पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांना वाघांचे दर्शन होत होते.

त्यामुळे 31 डिसेंबरची रात्र आणि नवीन वर्षाचे स्वागताच्या जल्लोषासोबत वनपर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, 31 तारखेला दुपारीच अचानक आलेल्या ढगांच्या दाटीसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नववर्षाच्या स्वागतावर पाणी फिरले. त्यासोबतच वन्यप्राण्यांसह वाघांचेही दर्शन न झाल्याने निराशाच पदरी पडली असे एक पर्यटक माया पाटील म्हणाल्या.

बखारी आणि बांद्रा या परिसरातील पर्यटन बंद

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार प्रवेशद्वार 20 टक्‍क्‍यांच्या नवीन पर्यटन क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा हमखास वाघाचे दर्शन होणारे बखारी आणि बांद्रा या परिसरातील पर्यटन बंद करण्यात आलेले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. यामुळे खुर्सापार परिसरातील पर्यटनाला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

वन्यप्राणी दिसले नाही
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्वच प्रवेशद्वारातून जंगल पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांना वाघाचे हमखास दर्शन होत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे वाघांसह इतरही प्राण्यांचे दर्शन न झाल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे नववर्षाच्या आनंद फार काळ टिकला नाही. पाऊस आणि जंगलात वाढलेला थंडीच्या गारठ्यामुळे वन्यप्राण्यांचे दर्शन झाले नाही.
- संगीता गांवडे, पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com