
नागपूर : राज्य पोलिस दलातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आल्या. त्या पोलिस अधिकाऱ्यांनी पदभारही स्वीकरला. मात्र, पोलिस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडून ठेवण्यात आल्या. त्यामुळे पोलिस दलात नाराजीचा सूर उमटला आहे.
कोरोनामुळे गेल्या पाच महिण्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आतापर्यंत दोनदा बदल्यांचा मुर्हूत टळला होता. चक्क पोलिस महासंचालक जयस्वाल यांनी ‘प्रसंगी सुटीवर जाईल पण मनमानी बदल्यांच्या यादीवर सही करणार नाही’ असे बदल्यांबाबत मोठे विधान केले होते. तसेच गणपती विसर्जनापर्यंत कोणत्याही बदल्या करू नये असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पाऊल मागे घेत बदल्या थांंबविल्या होत्या.
आतापर्यंत बदल्यांसाठी दोनदा तारीख देण्यात आली होती. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे बदल्या रखडल्या होत्या, असे बोलले जाते. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त पोलिस महासंचालक, आयुक्त, पोलिस महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने करण्यात आल्या.
उर्वरित बदल्यांची यादी दुसऱ्या दिवशी निघण्याची प्रतीक्षा पोलिस अधिकारी करीत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नसल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा रखडल्यामुळे राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहरात तब्बल ५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामध्ये सहपोलिस आयुक्त या महत्वाच्या पदाचा समावेश आहे. तसेच दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन पोलिस उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. यासोबतच दोन पोलिस उपायुक्तांचा जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने तेसुद्धा बदलींच्या प्रतीक्षेत आहेत.
पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय पोलिस महासंचालक घेतात. मात्र, अद्याप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्यामुळे महासंचालकांनी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबदून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आगली खदखद सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.