संचारबंदीत तुकराम मुंढे यांनी शिक्षकांना का दिले असे आदेश?... केले जातेय आश्चर्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कालच आदेश निर्गमित करण्यात आली. काही शिक्षकांनी करोनामुळे राज्यातच जमावबंदी लागू असल्याचे सांगून परिस्थिती निवळल्यानंतर रुजू करून घ्यावे, अशी विनंती शिक्षणाधिकारी यांच्याकडे कोली होती. मात्र आज (ता.24) अनेक शिक्षकांना फोन करून रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.

नागपूर : महापालिकेच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मालमत्ता कर विभागात रुजू होऊन कर वसुलीला येण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकराम मुंढे यांनी दिले आहे. बुधवारी (ता.25) जो रुजू होणार नाही त्यांना निलंबित करण्यात येतील, अशा धमक्‍या आयुक्तांच्या नावाने संबंधित शिक्षकांना फोनवरून दिल्या जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महापालिकेतील तब्बल 174 शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. त्यांना इतरत्र पाठवण्याऐवजी आपल्याच कार्यालयात सामावून घेण्यात यावे असा निर्णय महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार मुंढे यांनी सर्वांना मालमत्ता कर विभागात रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे सध्या करोनामुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थितीसुद्धा 10 टक्‍क्‍यांवर आणली आहे. आरोग्य आणि स्वच्छता वगळता सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना अतिरिक्त शिक्षकांना उद्याच रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कालच आदेश निर्गमित करण्यात आली. काही शिक्षकांनी करोनामुळे राज्यातच जमावबंदी लागू असल्याचे सांगून परिस्थिती निवळल्यानंतर रुजू करून घ्यावे, अशी विनंती शिक्षणाधिकारी यांच्याकडे कोली होती. मात्र आज (ता.24) अनेक शिक्षकांना फोन करून रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. अन्यथा निलंबित करण्यात येईल, असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकल्या जात आहे. सर्व फोन शाळानिरीक्षकांच्या माध्यमातून केले जात आहे. मुंढे आणि निलंबनाचा धाक दाखविल्या जात असल्याचा आरोप शिक्षकांचा आहे.

 - त्या नराधमांना शिक्षा द्यायला तिला हवाय रामपुरी चाकू! 

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 
सध्या राज्यात संचारबंदी सुरू आहे. जीवनावश्‍य सेवा वगळता इतरांना घरून कम करण्यास सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागपूर महापालिकेत शिक्षकांना मालमत्ता कर वसुलीचे निर्देश देण्यात आले असल्याची तक्रार काही शिक्षकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे समजते. राज्याचे शिक्षण व आरोग्यमंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे कळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe arders to teachers