एक काळ होता टी. चंद्रशेखर यांचा, आता आले टी. मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

नागपूर : टी. चंद्रशेखर आयुक्त असताना नागपूर महापालिका घोटाळ्यांमुळे राज्यभर चांगलीच गाजली होती. क्रीडा घोटाळ्यात अनेक नगरसेवकांना त्यांनी पोलिस कोठडी दाखवली होती. आता तुकाराम मुंडे यांना महाआघाडी सरकारने नागपूरला पाठवले असल्याने कोणते घबाड बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर : टी. चंद्रशेखर आयुक्त असताना नागपूर महापालिका घोटाळ्यांमुळे राज्यभर चांगलीच गाजली होती. क्रीडा घोटाळ्यात अनेक नगरसेवकांना त्यांनी पोलिस कोठडी दाखवली होती. आता तुकाराम मुंडे यांना महाआघाडी सरकारने नागपूरला पाठवले असल्याने कोणते घबाड बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत कोट्यवधींचा क्रीडा घोटाळा झाला होता. याच कार्यकाळात मनपात मेगाभरती झाली होती. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नंदलाल यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. विशेष म्हणजे तत्पूर्वी नंदलाल हेसुद्धा नागपूरचे महापालिकेत आयुक्त होते. त्यांनी सादर केलेल्या घोटाळ्याच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचे खासमखास समजले जाणारे सनदी अधिकारी टी. चंद्रशेखर यांना नागपूरला आयुक्त म्हणून पाठविले होते. क्रीडा घोटाळा प्रकरणी त्यांनी फौजदारी तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे भाजपच्या अनेक नगरसेवकांना पोलिस कोठडीत डांबण्यात आले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. क्रीडा साहित्य खरेदीच्या पावत्या सादर करून अनेक नगरसेवकांनी स्वतःच्या घरचे फर्निचर केले होते, काहींनी नुसत्याच पावत्या सादर केल्याचे उघडकीस आले होते. यानंतर चंद्रशेखर यांनी भाजपच्या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीमधील 106 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. यात अनेक आमदारांच्या व तत्कालीन भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांचाही समावेश होता.

- मोठी बातमी : गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली ही गंभीर घटना, तीन नराधमांनी विद्यार्थिनीला नेले झुडपात

महापालिकेतील कुठले घबाड बाहेर येणार?
सध्या सुमारे तेरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सिमेंट रोड, चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना, एलईडी पथदिवे यासारखे कोट्यवधींचे प्रकल्प येथे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधीही मनपाला मिळाला. अनेकांना प्रकल्पांच्या खर्चात काळेबेरे दिसत आहे. याच्या तक्रारी आणि आरोपसुद्धा करण्यात आले आहेत. मात्र केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने दखल घेतली नाही. राज्यात सत्ता बदलताच महाआघाडीने दखल घेऊन मुंडे यांना खास चौकशीसाठी पाठवल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे क्रीडा घोटाळा उघडकीस आल्यानंतर महापालिकेतील भाजपची सत्ता गेली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe to take charge as municipal commissioner of nagpur