भयंकर! महिने सहा अन् शेतकरी आत्महत्या वीस; मदत मात्र दोन प्रकरणातच

नीलेश डोये
Tuesday, 17 November 2020

अनेक उपाययोजनानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. जानेवारी २०२० पासून ते ऑक्टोबरदरम्यान २० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालीत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरण जूनपर्यंतची आहेत. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान एकाही मृत्यूची नोंद नाही.

नागपूर : सहा महिन्यांत नागपूर जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. परंतु, दोनच प्रकरणात मदत देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यापासून एकाही शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांची आत्महत्या टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्याचा दावा करण्यात येते. परंतु, त्याचा फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुसरीकडे पीक चांगले झाल्यावरही भावच मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही.

अनेक उपाययोजनानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. जानेवारी २०२० पासून ते ऑक्टोबरदरम्यान २० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालीत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरण जूनपर्यंतची आहेत. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान एकाही मृत्यूची नोंद नाही.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

या २० प्रकरणांपैकी दोन प्रकरणात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना देण्यात आलेल्या माहितीतून समोर आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना मदत देणाऱ्या हेडमध्ये निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे मदत देण्यात आली नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty farmers commit suicide in six months in the district