याला म्हणतात आत्मविश्वास! फेरमूल्यांकनात जुळ्यांचे गुण ‘सेम टू सेम'; दहावीच्या निकालात दुसऱ्या स्थानावर

मंगेश गोमासे 
Saturday, 19 September 2020

फेरमूल्यांकनातही दोघांचे ‘सेम टू सेम' ८ गुण वाढले आहे. या गुणवाढीमुळे दोघांनींही गुणवत्ता यादीत ९८.६० टक्क्यासह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकाविले आहे.

नागपूर : दहावीच्या निकाल २९ जुलैला घोषीत करण्यात आला. निकालात रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलच्या अथर्व, आदिती टेंभूर्णीकर या जुळ्या भाऊ आणि बहिणीला ९७ टक्के गुण मिळाले. मात्र, मिळालेल्या गुणावर समाधान होत नसल्याने दोघांनीही फेरमूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज केला. 

फेरमूल्यांकनातही दोघांचे ‘सेम टू सेम' ८ गुण वाढले आहे. या गुणवाढीमुळे दोघांनींही गुणवत्ता यादीत ९८.६० टक्क्यासह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकाविले आहे.

असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

दहावीच्या निकालात जे. पी. इंग्लिश स्कूलच्या समीक्षा पराते हिने ९९.४० टक्के गुणांसह विदर्भातून प्रथम येणाच्या मान पटकाविला. यापाठोपाठ याच शाळेतील सानिका गोतमारे, सोमलवार निकालस शाळेचा हृषिकेश चव्हाण, साउथ पब्लिक स्कूलची हिमांश्री गावंडे यांनी ९८.४० टक्‍क्‍यांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकाविले होते. 

दरम्यान अथर्व, आदिती टेंभूर्णीकर यांनी निकालात काही विषयात अपेक्षित गुण मिळाले नसल्याने बोर्डाकडे फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला. अथर्व, आदिती टेंभूर्णीकर शाळेतील हुशार विद्यार्थी असल्याने शिक्षकांनीही त्यांना फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. फेरमूल्यांकनाच्या निकालात दोघांचेही ८ गुण वाढले. यामुळे ९७ टक्क्यांवरुन त्यांची टक्केवारी ९८.६० वर गेली. 

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

त्यामुळे ९८.४० टक्के असलेल्या सानिका गोतमारे, हिमांश्री गावंडे आणि सोमलवार निकालस शाळेचा हृषिकेश चव्हाण हे तिसऱ्या स्थानावर आले आहेत. याशिवाय अथर्व, आदिती टेंभूर्णीकर दुसऱ्या स्थानावर आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा सोमलवार हायस्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या या कामगिरीचे संस्थेचे सचिव प्रकाश सोमलवार व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twins tenth marks are increased in rechecking in nagpur