esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi has many Guinness World Records on his name

आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या नावावर एक नाही दोन नाही तर अनेक रेकॉर्ड आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? या रेकॉर्डची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. आज आम्ही तुम्हाला मोदींच्या याच रेकॉर्डतोड कामगिरीविषयी सांगणार आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीमत्व आणि चेहरा भारतातच नाही तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. एक चहा विकणारा गरीब मुलगा ते भारतासारख्या जागतिक महासत्ता होऊ इच्छिणाऱ्या देशाचे पंतप्रधान हा त्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पंतप्रधान मोदींच्या या संघर्षामुळेच अनेक जण त्यांचे चाहते आहेत.

त्यांच्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. मात्र आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या नावावर एक नाही दोन नाही तर अनेक रेकॉर्ड आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? या रेकॉर्डची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. आज आम्ही तुम्हाला मोदींच्या याच रेकॉर्डतोड कामगिरीविषयी सांगणार आहोत. 

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

सर्वात महागडा सूट 

मोदींनी अमेरीकीचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची घेतलेली भेट होती.  या भेटीदरम्यान मोदींनी अंगावर सूट घातला होता. त्यानंतर या 'सुटचा’ लिलाव केला गेला. हा सुट तब्बल ४.३१ कोटी रुपयांना विकला गेला. ‘लिलावामध्ये विकला गेलेला आजवरचा सर्वात महाग सूट’ आहे अशी गिनीज बुक मध्ये या विक्रमाची नोंद झाली. हा सुट सुरतचे हिरा व्यापारी लालजी पटेल यांनी खरेदी केला होता. 

सर्वात मोठी सबसिडी योजना 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘पहल’ योजनेंतर्गत देशभरातील १८.१० कोटी एलपीजी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीचे २५३ कोटी रुपये जमा करण्यात आले. या कामगिरीसोबतच ही योजना ‘जगातील सर्वात मोठी रोख सबसिडी योजना’ बनली.

उघडली सर्वाधिक बँक खाती 

२३ ते २९ ऑगस्ट २०१४ या कालावधीत जनधन योजनेंतर्गत १८,०९६,१३० करोड बँक खाती उघडली गेली. ‘अत्यल्प वेळात उघडण्यात आलेली सर्वात जास्त बँक खाती’ म्हणून या कामगिरीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे घेण्यात आली. 

योग दिनाला २ विक्रमांची नोंद 

२१ जून २०१५ रोजी राजपथ मार्गावर साजरा करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवशी  गिनीज बुक मध्ये दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. पहिला विश्वविक्रम म्हणजे या दिवशी तब्बल ३५,९८५ लोकांनी योगाभ्यासाचा अनुभव घेतला. दुसरा विश्वविक्रम म्हणजे या योगदिनी तब्बल ८४ देशांचे नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. 

मोदींचे 3D भाषण 

२०१३ मध्ये मोदी निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत होते. एका सभेमधील त्यांचे भाषण 3D मध्ये ५३ ठिकाणी दाखवण्यात आले आणि अशी गोष्ट जगात पहिल्यांदाच घडली असल्याने हा विक्रम गिनीज बुक मध्ये विराजमान झाला. 

व्हीलचेअरवर बसून Happy Birthday PM 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांनी जगातील सर्वात मोठा व्हीलचेअर लोगो बनविण्याचा विश्वविक्रम केला. व्हीलचेअरवर बसून Happy Birthday PM अश्या अक्षरांत दिव्यांग नागरिकांनी हा विश्वविक्रम केला. ९८९ अपंग व्यक्तींनी एकाचवेळी एकाच ठिकाणी ३० सेकंदामध्ये सर्वाधिक पणत्या पेटवण्याचा विश्वविक्रम नोंदवला. ११३३० अपंगाना Assitive kits प्रदान करण्याचा विश्वविक्रम देखील साकारण्यात आला.

एकदा वाचाच - ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तब्बल ५ कोटी जिंकलो आणि आयुष्य झाले खडतर" स्वतःच सांगतोय करोडपती सुशील कुमार..वाचा सविस्तर

‘गुजरात की स्वर्ण जयंती’ या कार्यक्रमादरम्यान तब्बल ६ विश्वविक्रम 

नोव्हेंबर २०१० मध्ये  या कार्यक्रमादरम्यान १०१ तास २३ मिनिटे निरंतर गाणे गाण्याचा विक्रम. हे गाणे शास्त्रीय गायिका धरी पंचमदा यांनी गायले होते. पंचमदा यांनी या कार्यक्रमामध्ये २१४ राग आणि २७१ बंदिशी सादर केल्या. जो एक विश्वविक्रम ठरला. 

डिसेंबर २०१० मध्ये गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये २० हजार खेळाडूंनी एकच वेळेस बुद्धीबळ खेळून नवा विश्वविक्रम नोंदवला  एप्रिल २०११ मध्ये निरंतर सतार वाजवून गायकांनी २९ राग सादर केले आणि नवा विश्वविक्रम रचला. एप्रिल २०११ मध्येच ३१५ वादकांनी एकाच वेळेस तबला वाजवून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.   मे २०११ मध्ये ४५०० कलाकारांसोबत जगातील सर्वात मोठा नृत्य आणि संगीत कार्यक्रम पार पडला आणि नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली.आणि त्यांच्या ६६ व्या जन्मदिनी एकाच दिवशी तब्बल तीन नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली. 

संपादन - अथर्व महांकाळ