esakal | विचारपूस करता पोलिसांना दिली उडवाउडवीची उत्तरे, गाडीची डिक्‍की उघडली असता...

बोलून बातमी शोधा

Two Accused arrested with pistols by Crime Branch Police

पंकज सेन मूळचा राजस्थानमधील असून, केवळ गुंडगिरी करण्यासाठी तो नागपुरात आला होता. त्याला दीपेन डकाह याने साथ दिली. दोघांनी मिळून आतापर्यंत सदर, बजाजनगर आणि अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच गुन्हे केले आहेत.

विचारपूस करता पोलिसांना दिली उडवाउडवीची उत्तरे, गाडीची डिक्‍की उघडली असता...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दुचाकीच्या डिक्‍कीमध्ये पिस्तूल लपवून जात असलेल्या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. दीपेन दिलीप डकाह (वय 26, लक्ष्मीनगर) आणि पंकज नवलकिशोर सेन (वय 25, लक्ष्मीनगर) अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत.

पंकज सेन मूळचा राजस्थानमधील असून, केवळ गुंडगिरी करण्यासाठी तो नागपुरात आला होता. त्याला दीपेन डकाह याने साथ दिली. दोघांनी मिळून आतापर्यंत सदर, बजाजनगर आणि अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच गुन्हे केले आहेत. गुरुवारी दुपारी बजाजनगरातील अत्रे ले-आउटसमोरील जिलेबीच्या दुकानासमोरून दोन्ही आरोपी मोपेडने जात होते.

सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...

गुन्हे शाखेच्या दोन पथकांचे प्रमुख पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी लगेच सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. विचारपूस केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. त्यांना खाक्‍या दाखवताच त्यांनी एकाचा गेम करण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले.

दुचाकीची डिक्‍की उघडली असता पिस्तूल आढळले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पीआय अनिल ताकसांडे, पीएसआय लक्ष्मी तांबूसकर, मोहनलाल शाहू आणि संतोष मदनकर यांनी केली.