अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा... 

अनिल कांबळे
सोमवार, 1 जून 2020

चार मे रोजी सायंकाळी रोहितचा संजनाला फोन आला. मेकअप करून तयार राहण्याचे सांगून लॉंगड्राइव्हला जायचे असल्याचे सांगितले. सायंकाळच्या सुमारास तो संजनाच्या घराच्या काही अंतरावर आला. त्याने मिसकॉल देताच नटूनथटून बसलेली संजना लगेच आईला मैत्रिणीच्या घरून येते, असा निरोप ठेवून घराबाहेर पडली. 

नागपूर : अजनीत राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे चार युवकांनी बळजबरीने अपहरण केले. तिला बेसा रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये कोंडून ठेवले. चौघांनीही तिला दारू पाजून दोन दिवस गॅंगरेप केला. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर मुलीने अजनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून चार युवकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनीत राहणारी 16 वर्षीय मुलगी संजना (बदललेले नाव) ही अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिच्या वडिलाचे आजाराने निधन झाले तर आई मोलमजुरी करते. तिची मैत्री वस्तीतील रोहित रामटेके नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकासोबत झाली. संजनाच्या घरची आर्थिकस्थिती हलाखीची असल्याचे रोहितला माहिती होते. त्यामुळे तो तिला नेहमी मेकअपचे सामान, चॉकलेट, टेडीबीअर आणि शालेय उपयोगी सामान गिफ्ट करायचा.

हेही वाचा - रस्त्यावर फिरत होत्या आठ तरुणी, पोलिसांनी विचारताच ऐकविली अंगावर काटा आणणारी आपबीती

चार मे रोजी सायंकाळी रोहितचा संजनाला फोन आला. मेकअप करून तयार राहण्याचे सांगून लॉंगड्राइव्हला जायचे असल्याचे सांगितले. सायंकाळच्या सुमारास तो संजनाच्या घराच्या काही अंतरावर आला. त्याने मिसकॉल देताच नटूनथटून बसलेली संजना लगेच आईला मैत्रिणीच्या घरून येते, असा निरोप ठेवून घराबाहेर पडली. 

थेट नेले फ्लॅटवर

संजनाला रोहितने बाइकवर बसण्यास सांगितले. काही अंतर पार केल्यावर संजनाने कुठे जायचे आहे? असा प्रश्‍न केला. त्यावर रोहितने तिला हनिमूनसाठी जात असल्याचे सांगितले. काही मिनिटांतच दुचाकी बेसा रोडवरील ग्रीन सिटी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थांबली. तिला लगेच चेहऱ्याला स्कार्फ बांधण्यास सांगितले. त्यानंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले.

क्लिक करा - नवऱ्याला सोडले, प्रियकराला गाठले, आठ वर्षांनंतर त्यानेही नाकारले आता...

तीन मित्रांना केला फोन

दोघांनी काही वेळ गप्पा मारल्यानंतर रोहितने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लगेच त्याला घरी सोडण्याबाबत विचारले असता, त्याने आज रात्रभर हनिमून साजरा करायचा आहे, असे उत्तर दिले. आई ओरडेल म्हणून तिने घरी पोहोचवून देण्याचा हट्ट केला. मात्र, रोहितने लगेच अन्य तीन मित्र आकाश, सौरभ आणि चंदू यांना फोन केला आणि फ्लॅटवर बोलावून घेतले. 

यातनांची ओलांडली सीमा

रात्रीच्या आठ वाजता रोहितचे मित्र सौरभ, चंदू आणि आकाश हे फ्लॅटवर आले. त्यांनी दारूच्या बाटल्या, चिप्स, चिकन आणि काही बिअरच्या कॅन सोबत आणल्या होत्या. रोहितने संजनाला तिघांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. मात्र, तिने लगेच नकार दिला. त्यानंतर मात्र चारही नराधमांनी तिच्यावर रात्रभर बलात्कार केला.

अधिक माहितीसाठी - नागपुरात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू... हा परिसर ठरला चौथा हॉटस्पॉट

अशी केली सुटका

रात्रभर सामूहिक लैंगिक अत्याचार सहन केल्यानंतर तिला सकाळी घरी सोडून देण्याचे आमिष देण्यात आले. सकाळी तिने तयारी केली आणि घरी सोडून मागितले. मात्र, रोहितने सायंकाळपर्यंत थांबण्यास सांगितले. दुपारी पुन्हा चारही नराधमांनी दारू ढोसली आणि सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार सलग दोन दिवस चालला. तिसऱ्या दिवशी पहाटे चौघेही दारूच्या नशेत असताना संजनाने फ्लॅटवरून पळ काढला. एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून घर गाठले. 

असे आले प्रकरण उजेडात

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली संजना घरी येताच तिच्या चेहरा आणि शरीरावर असलेल्या ओरबड्यांवरून आईने परिस्थितीचा आढावा घेतला. तिनेही घडलेल्या अमानुष कृत्याबाबत आईला सांगितले. परंतु, आता तोंड उघडल्यास समाजात बदनामी होईल, अशी भीती होती. शेवटी कुटुंबीयांनी ठाम निश्‍चय करीत पोलिसांत तक्रार देण्याची हिंमत दाखवली. अजनीचे ठाणेदार संतोश खांडेकर यांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सौरव आणि आकाश या दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

रोहित, चंदूने केला होता मर्डर

गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी रोहित रामटेके आणि चंदू या दोघांनी अजनीत एका जणावर हल्ला करीत लूटमार केली होती. याप्रकरणी अजनी पोलिसांनी रोहित आणि चंदू यांना अटक केली होती. रोहित आणि चंदूने यापूर्वी दोन मर्डर केले होते. त्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती. यापूर्वी ते शिक्षा भोगून आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days gangrape on a sixteen year old girl