esakal | विद्युत धक्क्याने दोन महिला मजूर ठार; नरखेड तालुक्यातील खलानगोंदी शिवारातील घटना

बोलून बातमी शोधा

Two female workers killed in electric shock Nagpur rural news

रविवारी सकाळी महिला मजूर शेतात गेले असता करंट लागल्याने दोन महिला मंजूर जागीच ठार झाल्या. मृत महिला कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (वय ४८) व सुशीला सुरेशराव दहिवाडे (वय ४९) अशी मृतांची नावे आहेत.

विद्युत धक्क्याने दोन महिला मजूर ठार; नरखेड तालुक्यातील खलानगोंदी शिवारातील घटना
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील अंबाडा येथील शेतकरी नानाजी बेले यांची खलानगोंदी शिवारात शेती आहे. त्यांनी १२ एकर शेतात उन्हाळी भुईमूगची लागवड केली होती. रात्री येणारे जंगली प्राणी रोही, डुक्कर हे भुईमुगाचे अतोनात नुकसान करतात. पिकांच्या बचावासाठी ते दररोज रात्री तीन पेज लाईनचा करंट लावत होते.

रविवारी सकाळी महिला मजूर शेतात गेले असता करंट लागल्याने दोन महिला मंजूर जागीच ठार झाल्या. मृत महिला कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (वय ४८) व सुशीला सुरेशराव दहिवाडे (वय ४९) अशी मृतांची नावे आहेत. याची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी पोलिस स्टेशन जलालखेडा यांना भ्रमनध्वनीद्वारे माहिती दिली.

महत्त्वाची बातमी - आई मला खेळायला जायचं, जाऊ दे न वं..! मुलं हट्ट करत असतील तर निवडा 'हे' पर्याय

यानंतर जलालखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीषचंद्र गावडे यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथे पाठविला. आरोपी नानाजी बेले व चंद्रशेखर बेले यांना अटक सुध्दा केली आहे. घटनेचा पुढील तपास हिवसे करीत आहे.