esakal | मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'
sakal

बोलून बातमी शोधा

two friends made device called paribhraman

मित्राच्या अपघाताने  शुभम कानिरे आणि अभिजित खडाखडी हे दोन मित्र प्रचंड हळहळले. मात्र त्यांनतर या दोघांनी  घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या दोघांनी  मिळून एक यंत्र तयार केलं आहे.

मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण'

sakal_logo
By
अथर्व महांकाळ, सकाळवृत्तसेवा

नागपूर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण लहान गोष्टींसाठीही मोबाईलवर अवलंबून आहे. पैशांची देवाण -घेवाण करण्यापासून तर थेट कोणाचा पत्ता शोधण्यापर्यंत आपण गुगलचा वापर करतो. शहरात कुठलाही पत्ता शोधायचा असेल तर लोकं मोबाईलमध्ये असलेल्या 'मॅप' चा उपयोग करतात. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना किंवा कुरिअर सर्व्हिस देणाऱ्या लोकांना हमखास या मॅपमुळे त्यांच्या पत्त्यावर जाण्यास मदत होते. मात्र या मॅपमध्ये पत्ता शोधण्यासाठी सतत मोबाईलकडे लक्ष ठेवणं किंवा कानात इअरफोनच्या साहाय्याने रस्ता ऐकून पत्ता शोधावा लागतो. असाच एकावेळी पत्ता शोधताना तीन मित्रांपैकी एकाचा अपघात झाला. मात्र असा अपघात कोणाचाही होऊ नये म्हणून दोन मित्रांनी तयार केलं 'परिभ्रमण'.  

मित्राच्या अपघाताने शुभम कानिरे आणि अभिजित खडाखडी हे दोन मित्र प्रचंड हळहळले. मात्र त्यांनतर या दोघांनी  घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या दोघांनी  मिळून एक यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र गाडीमध्ये बसवल्यामुळे कुठलाही पत्ता शोधण्यास वाहन चालकाला मदत होणार आहे. या दोन तरुणांनी यंत्राचं नाव 'परिभ्रमण' असं ठेवलं आहे. आपल्या मित्राचा अपघात झाला तसा कोणाचाही होऊ नये म्हणून हे यंत्र तयार केल्याचं त्यांनी सांगितलंय. 

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

काय हे परिभ्रमण : 

  • शुभम आणि अभिजीतने परिभ्रमण हे यंत्र बनवले आहे. 
  • हे यंत्र ७० सेंटीमीटरचे असून वायरलेस आहे. 
  • हे यंत्र वाहनाच्या सीटखाली बसवता येऊ शकते. 
  • या यंत्राला स्पिकर्स कनेक्क्ट असणार आहे. 
  • हे स्पिकर्स गाडीच्या मीटरजवळ लावता येणार आहेत. 
  • या यंत्राला माईकही कनेक्ट करता येणार आहे. 

परिभ्रमणचे काम: 

एकदा हे यंत्र वाहनावर बसवले की चालकाला हवा तो पत्ता याद्वारे शोधता येणार आहे.. यासाठी चालकाला फोन या यंत्राला वायफायच्या माध्यमातून जोडावा लागणार आहे. यानंतर हे यंत्र स्पिकर्सच्या माध्यमातून चालकाला पत्ता सांगणार आहे. त्यामुळे चालकाला वारंवार स्क्रीनकडे बघण्याची गरज नसणार आहे. असे झाल्यास चालकाचे संपूर्ण लक्ष वाहन चालवण्यावर राहील आणि लोकांचा जीव वाचेल असे शुभम आणि अभिजतचे म्हणणे आहे. 

यंत्राची किंमत 

हे यंत्र बनवण्यासाठी शुभम आणि अभिजीतला अवघ्या पाचशे रुपयांचा खर्च आला आहे. यात वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी स्वस्त असल्यामुळे या यंत्राची किंमत कमी आहे. त्यामुळे हे यंत्र सर्वसामान्यांनाही आपल्या वाहनात लावता येणार आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

भविष्याची कल्पना 

भविष्यात या यंत्रामध्ये अपडेट करून अँटीथेफ्ट म्हणजेच चोरांपासून वाहनाला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा बसवण्याचा मानस शुभम आणि अभिजीतचा आहे. तसंच यात सिमकार्ड बसवून याद्वारे फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करण्याची इच्छा या दोघांची आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या यंत्राचे स्वतः उत्पादन करून विकण्याची इच्छाही या दोघांची आहे. एकूणच काय तर हे यंत्र तयार करण्यामागचे उदिष्ष्ट पैसे कमवणे हे नसून लोकांचा जीव वाचवणे आणि लोकांना त्यांच्या पत्त्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणे हे आहे. यामुळे अभिजित आणि शुभम या दोघांवरही सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.