
नागपूर : अलीकडे धावपळीच्या आयुष्यामुळे निवांतपणा, विश्रांती, स्वतःसाठी वेळ काढणे या बाबी दुर्मीळ झाल्या आहेत. दररोजच्या आयुष्यात ताणतणाव वाढून पूर्वी तरुणवयात न आढळणारे मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे शारीरिक आजार सरसकट होत आहेत. याशिवाय स्मृतिभ्रंश किंवा विस्मरणासह मानसिक आरोग्य बिघडत आहे. यामुळेच मानसोपचारतज्ज्ञांकडे गर्दी वाढत आहे. उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात मागील पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास दरवर्षी 2 हजार 700 नवीन मनोरुग्णांची भर पडत असल्याची माहिती पुढे आली.
कौटुंबिक, कार्यालयीन, महत्त्वाकांक्षा तसेच सामाजिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. कौटुंबिक अस्वास्थ्यामुळे कौटुंबिक आयुष्यात तणाव वाढत आहे. घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत आहे. कार्यालयीन जीवनात सहकाऱ्यांशी स्पर्धा, सततचे अस्थैर्य, खासगी नोकरीत केव्हाही काढून टाकले जाण्याची टांगती तलवार, पालकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे पाल्यांवर भार, घर आणि कार्यालयीन कामामुळे महिलांमध्ये होणारी चिडचिड, मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्यामुळे येणारी अपराधीपणाची भावना यातूनही नैराश्यासारख्या मानसिक आजाराच्या विळख्यात तरुणाईपासून तर प्रौढ अडकत आहेत.
2015 ते 2019 या पाच वर्षांत 13 हजार 369 नवीन मानसिक रुग्णांची नोंदणी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात झाली आहे. या पाच वर्षांत 2 लाख 45 हजार 866 रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले आहेत. 2015-16 मध्ये 44 हजार 706 मानसिक विकाराच्या रुग्णांची नोंद मनोरुग्णालयात झाली होती. तर, अवघ्या चार वर्षांत 10 हजारांनी यात वाढ झाली. 2018-19मध्ये 54 हजार 424 रुग्णांनी उपचार घेतले आहेत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून मागवली आहे.
भरती रुग्णांचा टक्का वाढला
प्रादेशिक मनोरुग्णालयात मागील पाच वर्षांत 2 लाख 45 हजार 866 मनोरुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार झाले आहेत. यापैकी सुमारे 32 हजार921 रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर प्रदीर्घ काळ उपचार करण्यात आले. यातील मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण बरे झाले आहेत, हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.