मध्यरात्री सुरू होते खोदकाम, कामगारांच्या अंगावर कोसळला ढिगारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

बुधवारी नेहमीप्रमाणे खाणीत काम सुरू असताना आत खोलवर गेलेल्या खाणीत कामगार काम करीत होते. रात्री बाराच्या सुमारास मजुरांच्या अंगावर वरून दगडमातीचा ढिगारा पडला. त्यात दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी कामगारांना उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

खापा (जि. नागपूर)  : मॉइल ओर इंडिया लिमिटेड गुमगाव माइनद्वारे चीन येथील एका कंपनीला खापा परिसरातील तिघईजवळ सुरू झालेल्या माइनमध्ये नवीन व्हर्टिकलचे काम देण्यात आले. या व्हर्टिकलमध्ये बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास काम सुरू असताना खाली काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर दगडमातीचा ढिगारा कोसळला. याच्याखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

पंकज खुशाल चौरीवार (वय 25, गडेगाव), चीन येथील चैन गॅंग (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. अनिल देवमन बागडे व शॉंग वॉंग अशी जखमी कामगारांची नावे आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे खाणीत काम सुरू असताना आत खोलवर गेलेल्या खाणीत कामगार काम करीत होते. रात्री बाराच्या सुमारास मजुरांच्या अंगावर वरून दगडमातीचा ढिगारा पडला. त्यात दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी कामगारांना उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

खाणीत दबून दोन कामगारांचा मृत्यू; दोघे जखमी
या वेळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी त्वरित जिल्हाधिकारी नागपूर व मॉइलच्या मुख्य प्रबंधकांना अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले. मृत व जखमींच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, असे आदेश केदार यांनी मॉइल प्रशासनाला दिले.

- पत्नीसह चाट खात होता पोलिस, टेबलवर दिसली ही जीवघेणी वस्तू... मग

मंत्री सुनील केदारांचे चौकशीचे आदेश
या वेळी मॉइल प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी कोणत्या व्यापक उपाययोजना केल्या, कर्मचाऱ्यांना योग्य सरंक्षण देण्याकरिता कोणत्या प्रकारच्या योजना कार्यरत आहेत, याचे स्पष्टीकरण त्वरित सादर करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री केदार यांनी मॉइल प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खाण कामगारांची योग्य काळजी घेणे हे मॉइल प्रशासनाचे कर्तव्य आहे. कर्तव्यापासून मुकलेल्या अधिकाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे स्पष्ट आदेश मंत्री सुनील केदार यांनी मॉइल प्रशासनाला दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two workers died in mine two injured