पत्नीसह चाट खात होता पोलिस, टेबलवर दिसली ही जीवघेणी वस्तू... मग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अमरावती  : वाहतूक शाखेतील एक पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून घरी गेला. त्यानंतर रात्री नऊ वाजता पत्नी व लहान मुलासह एका चाटभंडारच्या गाडीजवळ गेले. चाट खात असताना पत्नीला टेबलवर पडलेली एक वस्तू. तिने लगेच याबाबत पतीला सांगितले.

त्याचे झाले असे की, वाहतूक शाखेतील पोलिस संदीप राठोड हे राजकमल चौकातून रात्री नऊ वाजता ड्यूटी आटोपून घरी गेले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास पत्नी, लहान मुलासह ते दस्तुरनगर मार्गावरील गोंडबाबा मंदिराजवळ एका चाटभंडारच्या गाडीजवळ आले. त्यांच्यासमोरुन दोन युवक येथील टेबलवर बसून, नास्ता करून निघून गेले.

पोलिस शिपायाच्या चाणाक्ष पत्नीने टेबलवर पडून असलेली वस्तू देशीकट्यासारखी असल्याचे ओळखले. तिने पतीला माहिती दिली. संदीप यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिस पोहोचण्यापूर्वी ज्यांचा हा देशीकट्टा होता, ते दोघे येथे आले. त्यापैकी एकाने कट्टा उचलून कमरेत खोचला. ते पळत असल्याचे बघून येथे नास्ता करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पकडले. दोघांना आवरणे कठीण झाले.

- आगपेटी न दिल्याने डोक्‍यात भडकली आग मग केले हे...
 
देशीकट्टा पकडण्यात वाहतूक पोलिसाची महत्त्वाची भूमिका
त्यामुळे ज्याचेजवळ कट्टा होता. तो निसटला दुसरा सापडला. त्यानंतर राजापेठ पोलिस येथे पोहोचले. ज्याला संदीपने पकडून ठेवले होते. त्याने शुभम पांडे याचे नाव सांगितले असता राजापेठ पोलिसांनी कट्टयाचा मालक शुभम पांडेला पकडले.

- टाळी वाजवणाऱ्यांसाठी होणार 'कल्याण'!

काहीही घडू शकले असते
देशीकट्ट्यात काडतूस नव्हते म्हणून बरे झाले. अन्यथा, आपल्या सहकाऱ्याला पकडल्यानंतर दुसऱ्याने निश्‍चितच पोलिसावर गोळी झाडली असती, सुदैवाने अनर्थ टळला. विशेष म्हणजे, आपल्या खात्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने या महत्त्वपूर्ण घटनेत मदत केली. असा साधा उल्लेख करण्याचे सौजन्यही राजापेठ पोलिसांनी दाखवले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: off duty police perform special task