esakal | भाजपकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Union Budget updates announcement of 5976 crore to nagpur metro

गेल्या २०१७ मध्ये नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अनेक दिवस काम संथ गतीने सुरू होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येताच मेट्रोच्या कामाचा वेग वाढला. निवडणुकीपूर्वी शहरात मेट्रो धावलीच पाहिजे, असा चंग जणू भाजपने बांधला होता.

भाजपकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. गेल्या १५ दिवसांत अनेक कामांचे लोकार्पण केले आहे. त्यातच आता केंद्राने नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. काही महिन्यात महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा परिषद, पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड करून सोडले. मात्र, आता भाजपला महापालिका गमवायची नाही, असे भाजपने कदाचित ठरविले असावे. त्यामुळेच केंद्रांकडून विकासकामांसाठी वारंवार निधी दिला जातो की काय? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - Budget 2021 : नागपूर मेट्रोसाठी ५,९७६ हजार कोटींची घोषणा

गेल्या २०१७ मध्ये नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अनेक दिवस काम संथ गतीने सुरू होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येताच मेट्रोच्या कामाचा वेग वाढला. निवडणुकीपूर्वी शहरात मेट्रो धावलीच पाहिजे, असा चंग जणू भाजपने बांधला होता. त्यानुसार त्यांनी ते पूर्ण करून दाखविलं. त्याचाच फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये झाला. मात्र, त्यामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला जिल्हा परिषद आणि पदवीधर निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच आता २०२२ च्या दुसऱ्याच महिन्यात नागपूर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिका आपणच जिंकू, असा भाजपला विश्वास आहे. मात्र, त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. कारण, राष्ट्रवादीनेही विदर्भात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही मिळून भाजपला आव्हान देतील यात शंका नाही.  त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आपली कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला वित्तीय मान्यताच नव्हे तर पुन्हा सल्लागार कंपनी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्राकडून तब्बल १६०० कोटी रुपयांची वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा - पेट्रोलबरोबर आता साखरही भडकणार; कारखानदारांचा फायदा तर सामान्यांवर बोझा

गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात एकूण ८६ हजार कोटींची विकास कामे झाली किंवा सुरू असल्याचे नमुद केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यकाळात एक हजार कोटी शहराला दिल्याचेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे या कामांचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करा, अशा सूचना त्यांनी शहर भाजप अध्यक्षांना दिल्या. त्यामुळे आता भाजप महापालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झाल्याचे चित्र आहे. शहर सुंदर करायचे असेल तर महापालिका, राज्य, केंद्रात सरकार हवी, असे नमुद करीत त्यांनी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकप्रकारे कामाला लागण्याच्या सूचनाच केल्या. महापालिका आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावला असला तरी गडकरी यांच्या उत्स्फूर्त भाषणाने नगरसेवकांतही जोश भरल्याचे दिसून येत असून अनेकांना गेल्या चार वर्षात केलेल्या कामांची कागदपत्रे चाळणे सुरू केले आहे. 

हेही वाचा - घरगुती उपचार, गोळ्या घेऊ नका; सुरक्षित गर्भपातासाठी आहे ‘मर्जी हॉटलाइन’; माहितीअभावी...

दरम्यान, अजनीतील 'मल्टी मॉडेल हब'ला केंद्राकडून १२०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजसाठी ५ हजार ९७६ कोटी रूपये जाहीर करण्यात आले आहेत. ही मेट्रो कामठी, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा मिळावा, यासाठीच केंद्र वारंवार नागपूरला निधी देत असल्याचे बोलले जात आहे. 
 

go to top