विदर्भावर पुन्हा ढग दाटले... तो पुन्हा येणार... पुन्हा येणार... पुन्हा येणार...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार आहे.

नागपूर : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकरी पार शिराश झाला होता. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. मात्र, मधल्या काळात व पावसाळ्याच्या शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता. पावसाळ्याच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यातही मोठी वाढ झाली होती. मात्र, पाऊस सतत हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अशातच रविवारपासून पुन्हा विदर्भात पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

वरुणराजा यंदा विदर्भातून जाण्याच्या मुडमध्येच दिसत नाही आहे. दोन-चार दिवस गेले की हमखास हजेरी लावतो. येत्या रविवारपासून पुन्हा हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, "वेस्टर्न डिस्टर्बन्स' व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये पुढील दोन-तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

बापरे! - Video : स्वप्नात आले शंकरजी... म्हणाले शेतातल्या झाडातून निघेल हे...

त्याच्या प्रभावामुळे विदर्भातही रविवारपासून दोन-तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्‍यता आहे. विशेषत: नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार आहे. शुक्रवारीही शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात 18.2 अंशांपर्यंत वाढ झाली होती. 

हिवाळ्यातही पावसाळा

यंदाचा हिवाळा पावसाळ्यातच गेल्यासारखे वातावरण विदर्भात होते. दोन-तीन दिवसांआड पाऊस पडत असल्यामुळे हिवाळा आहे की पावसाळा असाच प्रश्‍न नागरिकांना पडत होता. घरून निघताना स्वेटर व जॅकेट घालावे की रेनकोट असाच प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत होता. सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा व रात्री हिवाळा अशाच वातावरणात हिवाळा निघून गेला. 

अजून भरपूर काही बघायच

सतत येत असलेल्या पावसाने सोशन मीडियावर अनेक जोक्‍स फिरत होते. दिवाळी पाहून जातो, मतदान करून जातो, महाराष्ट्रात कोणता पक्ष सत्ता स्थापण करणार, कोण मुख्यमंत्री होणार? यांना जोडून पावसाची खिल्ली केली जात होती. आता अजून भरपूर काही बघायच आहे, असे पावसावर जोक्‍स येऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha may receive rain again on sunday