Video : स्वप्नात आले शंकरजी... म्हणाले शेतातल्या झाडातून निघेल हे...

श्रीकृष्ण गोरे 
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

कुळसंगे यांच्या शेतामध्ये चाळीस वर्षांपूर्वीपासून कडूलिंबाचे झाड आहे. त्या झाडामधून काही दिवसांपूर्वी पांढरे पाणी निघत होते. परंतु कुळसंगे कुटुंबीयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी सुधाकर कुळसंगे यांची पत्नी कविता यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे सुधाकर यांनी आपल्या पत्नीला राजुरा, गडचांदूर येथील अनेक दवाखान्यात दाखवले. तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील एका दवाखान्यात दाखविण्यात आले.

राजुरा (जि. चंद्रपूर) : अधूनमधून आपल्याला निसर्गाच्या चमत्काराबद्दल ऐकायला मिळते. त्याची सर्वत्र चर्चाही होते. परंतु सर्वसामान्य लोक या नैसर्गिक घटनेला दैवी चमत्कार समजून ते बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. असाच एक नैसर्गिक प्रकार राजुरा तालुक्‍यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगी (खुर्द) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शेतशिवारात बघायला मिळाला. तेथे एका कडुलिंबाच्या झाडातून दुधासारखा पांढरा द्रवबाहेर पडत असल्याचा प्रकार दिसून आला. 
मात्र, महाशिवरात्रीच्या पर्वावर घडलेल्या या नैसर्गिक प्रकाराला काही अंधश्रद्धाळू लोकांनी चक्क दैवी चमत्कार समजून तो पाहण्यासाठी गर्दी केली. 

राजुरा तालुक्‍यात मंगी हे गाव. चार गुडे मिळून 1890 लोकसंख्या असलेल्या मंगी (खुर्द) येथे राहणाऱ्या सुधाकर कुळसंगे यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडामधून अचानक दूध निघत असल्याचे काहींच्या लक्षात आले. हा चमत्कार म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्वावर प्रत्यक्ष भगवान शंकराने दिलेले दर्शन असल्याचे नागरिक बोलत आहेत. 

 

 

कुळसंगे यांच्या शेतामध्ये चाळीस वर्षांपूर्वीपासून कडूलिंबाचे झाड आहे. त्या झाडामधून काही दिवसांपूर्वी पांढरे पाणी निघत होते. परंतु कुळसंगे कुटुंबीयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी सुधाकर कुळसंगे यांची पत्नी कविता यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे सुधाकर यांनी आपल्या पत्नीला राजुरा, गडचांदूर येथील अनेक दवाखान्यात दाखवले. तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील एका दवाखान्यात दाखविण्यात आले.

देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री?

तरीपण कविताच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. कविता यांच्या सांगण्यानुसार, बरेचदा त्यांच्या स्वप्नात भगवान शंकर येत होते. मात्र, याकडे त्या दुर्लक्ष करीत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात असलेल्या कडूलिंबाच्या झाडजवळ कडवट वास येत होता. त्यामुळे कविताचे डोके दुखत होते. हा प्रकार फक्त कविता व सुधाकर कुळसंगे व त्यांच्या परिवारातील लोकांसोबतच होत होता. 

Video : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस, तब्बल दहा राज्यमंत्र्यांनी केली कॅबिनेटमंत्र्यांची तक्रार

भगवान शंकर आले स्वप्नात 
कविता कुळसंगे यांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांच्या स्वप्नात भगवान शंकर आले. ते तिला म्हणाले की, मी तुमच्या शेतात कडुलिंबाच्या बुंध्यामधून दुधाच्या रुपाने प्रत्यक्ष येत आहे. तुम्ही गावातील नागरिकांना दर्शनासाठी बोलवा, असे म्हणाल्याचे कविता म्हणाल्या. त्यानुसार कविता व कुळसंगे कुटुंबीयांनी सकाळी त्या झाडाजवळ पूजा-अर्चना चालू केली आणि गावातील काही नागरिकांना या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी शेतातील झाडाजवळ जाऊन पाहिले असता झाडातून खरोखरच दुधाची धार निघत असल्याचे दिसून आले.

हा प्रत्यक्ष प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर ही वार्ता पाहता पाहता संपूर्ण राजुरा तालुक्‍यात पसरली. त्यामुळे शुक्रवार सकाळपासून मंगी गावामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक हा चमत्कार पाहण्यासाठी येऊ लागले. या चमत्काराच्या रुपाने कविता व सुधाकर कुरसंगे या परिवाराला महाशिवरात्रीच्या पर्वावर साक्षात भगवान शंकराचे दर्शन झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur villegers gather to worship tree at farm