विदर्भाच्या या युवा क्रिकेटपटूला घालायचीय "इंडिया कॅप'

नरेंद्र चोरे
Sunday, 26 July 2020

महेंद्रसिंग धोनीचा "फॅन' असलेला दर्शन मुळात मध्यमगती गोलंदाज असला तरी, फलंदाजीवरही तो तितकीच मेहनत घेत आहे. त्याला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विदर्भ संघात स्थान पक्‍के करायचे आहे. शिवाय वनडे, टी-20 आणि चारदिवसीय या तिन्ही "फॉर्मट'मध्ये त्याला स्वत:ला सिद्‌ध करायचे आहे. 

नागपूर : गेल्या वर्षी घरगुती सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारा विदर्भाचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा दर्शन नळकांडे याला क्रिकेटच्या तिन्ही "फॉर्मट'मध्ये आपली उपयुक्‍तता सिद्‌ध करून दाखवायची आहे. वनडे, टी-20 सोबतच चारदिवसीय सामन्यांमध्ये अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर भविष्यात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न असल्याचे दर्शनने बोलून दाखविले. 

आगामी घरगुती सीझनची सध्या तयारी करीत असलेला दर्शन म्हणाला, मागील वर्षीच्या एकूण कामगिरीवर मी समाधानी आहे. त्यामुळे यावर्षी पुनरावृत्ती करण्याचा किंवा त्याहून अधिक चांगले प्रदर्शन करण्याचा माझा निश्‍चितच प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी मी कसून मेहनत घेत आहे. लॉकडाउनमुळे गेल्या चार महिन्यांत मला अपेक्षेप्रमाणे "प्रॅक्‍टिस' करता आली नाही. केवळ फिजिकल फिटनेस व बेसिक ड्रीलच करता आली. सुदैवाने अकोल्यातील घरी मोकळी जागा असल्यामुळे "बॉलिंग' व "बॅटिंग' करता आली. लॉकडाउनचा काळ खरोखरच खेळाडूंची परिक्षा घेणारा होता. 2018-19 मध्ये महाराष्ट्राविरुद्‌ध रणजी पदार्पण करणाऱ्या 21 वर्षीय दर्शनने गेल्या मोहमातील सैयद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत (6 सामने) विदर्भाकडून सर्वाधिक 16 विकेट्‌स घेऊन देशात चौथे स्थान पटकाविले होते. शिवाय विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये आठ विकेट्‌स, 23 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील चार लढतीत 22 विकेट्‌स व 220 धावा, पाच वनडेत 11 विकेट्‌स आणि केरळविरुद्‌धच्या एकमेव रणजी सामन्यात 65 धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केले. 

 

हेही वाचा : मैदानावरच्या सरावाला ऑप्शनच नाही, घरात राहून होतंय "बोअर'!
 

महेंद्रसिंग धोनीचा "फॅन' असलेला दर्शन मुळात मध्यमगती गोलंदाज असला तरी, फलंदाजीवरही तो तितकीच मेहनत घेत आहे. त्याला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विदर्भ संघात स्थान पक्‍के करायचे आहे. शिवाय वनडे, टी-20 आणि चारदिवसीय या तिन्ही "फॉर्मट'मध्ये त्याला स्वत:ला सिद्‌ध करायचे आहे. दर्शन आक्रमक फलंदाज असून, "स्लॉग ओव्हर्स'मध्ये फटकेबाजी करून कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे झुकविण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. अनेकवेळा त्याने हे सिद्‌ध करून दाखविले. विदर्भाकडून ज्युनियर क्रिकेट खेळलेल्या थोरल्या भावापासून (गौरव) प्रेरणा घेत क्रिकेटमध्ये आलेल्या दर्शनचेही इतरांप्रमाणेच देशाकडून खेळण्याचे स्वप्न आहे. टीम इंडियाची "कॅप' घालण्याची त्याची इच्छा आहे. 

 

नागपुरातील बॅडमिंटनपटूंसाठी कोणती आहे आनंदाची बातमी, वाचा 
 

...तर संधीचे सोने करीन 

उशीरा का होईना आयपीएल सुरू होत असल्याबद्‌दल दर्शन खुश आहे. आयपीएल मोठी स्पर्धा आहे. यात देशविदेशातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. त्यांच्या सहवासात खुप काही शिकायला मिळते. त्या अनुभवाचा घरगुती क्रिकेटमध्ये खुप फायदा होतो. गतवर्षी अकरामध्ये संधी मिळाली नाही. यावेळी आशा करतो. संधी मिळाल्यास नक्‍कीच सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. यंदाची आयपीएल येत्या 19 सप्टेंबर ते 9 नोव्हेंबरदरम्यान संयुक्‍त अरब अमिरातमध्ये होणार आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha's Darshan Nalkande wants to wear "India Cap"