धमक्या मिळतात, पण मी जीवाला भीत नाही; शेवटपर्यंत ओबीसींसाठीच लढणार - वडेट्टीवार

अतुल मेहेरे
Wednesday, 4 November 2020

वडेट्टीवार ओबीसींच्या मुद्द्यावर काहीही वक्तव्य करत आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून सरकार चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला होता. याबाबतच विजय वडेट्टीवार बोलत होते. 

नागपूर : संदर्भात मला धमक्या मिळत आहेत, पाहून घेण्याची भाषा बोलली जात आहे. पण मी जीवाला भित नाही. जे व्हायचे ते होईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार ओबीसींच्या मुद्द्यावर काहीही वक्तव्य करत आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून सरकार चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला होता. याबाबतच विजय वडेट्टीवार बोलत होते. 

मराठा व ओबीसी समाजांमध्ये दुफळी निर्माण करीत असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोप वडेट्टीवार यांनी फेटाळून लावला. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो. यासंदर्भात धमक्या मिळत असल्या तरी मी जीवाला भीत नाही, जे व्हायचे ते होवो, अशी टोकाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. माझ्या समाजाला आरक्षण मिळल्याखेरीज भरती होऊ देणार नाही, हा काहींचा द्वेष्टेपणा आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. मी वारसा हक्काने राजकारणात आलो नसल्याचा टोला त्यांनी कुणाचे नाव न घेता लगावला. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मराठा आरक्षणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत मराठ्यांचे १२ टक्के आरक्षण बाजूला ठेवून ओबीसींची नोकरभरती करुन घ्यावी, अशी भूमिका ओबीसी महासंघाची आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन तशी मागणी रेटून धरली आहे. त्यावर माझ्यासाठी मंत्रिपद महत्वाचे नसून ओबीसी समाज महत्वाचा आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे. 

हेही वाचा - सामाजिक बांधिलकी जपून डॉ. भारत लाडे यांनी केले अनाथ मुलांना स्वेटरचे वाटप; अनाथांच्या चेहऱ्यावर...

गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाच्या समाजातील लोकांची भरती होत नाही. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. मुलांचे नोकरीचे आणि लग्नाचे वय निघून जात आहे. ही परिस्थिती समजून मराठा समाजाचे काही तरुणही माझ्याशी फोनवर बोलले आहेत. या तरुणांच्या मनातील भावना मी मांडल्या आहेत. हे मांडताना मला भीती वाटत नाही. कारण मी सत्य बाजू मांडतो आहे. संघर्ष करून आम्ही इथंपर्यंत आलो आहोत. त्यामुळे कितीही धमक्या आल्या तरीही मागे हटणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar replied to chandrakant patil statement on obc and maratha reservation in nagpur