गावकरी म्हणतात, खड्डयात गेले राजकारण, अगोदर रस्ता करा !

रुपेश खंडारे
Monday, 19 October 2020

तिसऱ्यांदा ऑनलाइन निविदा त्याच शर्ती अटीसहित  निविदेत प्रकाशित केल्या असताना, मात्र त्यात चुका शोधून नियंमाचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करुन तिच निविदा रद्द करण्याचे निर्णय माजी स्थायी समितीने बहुमताने निर्णय घेतला. ती निविदा रद्द करण्यात यावी व मागील निविदा रद्द करावी असा निर्णय घेण्यात आला. ठरावात चुका असल्याचे कारण पुढे करुन बहुमताच्या जोरावर निविदा रद्द करणे कितपत योग्य आहे? त्यामुळे काही ठरावीक लोकांचे हित साध्य करण्याकरीता हा ठराव तर रद्द केला नाही ना, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

पारशिवनी (जि.नागपूर) : जुने बसस्थानक ते संत तुकाराम सभागृह मार्गावरील अतिक्रमण काढून या मार्गाचे रुंदीकरण केले. नाली बांधकाम व रस्ता बांधकामाकरीता नगरपंचायत कार्यालयाने एक कोटी छप्पन लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याकरीता निविदाही प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मागील स्थायी समितीला त्या निविदेत चुका व अटीनियमांचे पालन केले नसल्याचे आढळले नाही. एक नव्हे तर दोन तिनदा एकाच कामाच्या निविदा प्रकाशित केल्या असताना नगरपंचायतच्या स्थायी समितीला त्या निविदेत चुका का आढळल्या नव्हत्या? दोनदा निविदा काढून त्यात जर चुका, अटी, नियमांची पायमल्ली केली तर त्यावर स्थायी समितीने कोणताही आक्षेप त्यावेळी का घेतला नाही? साधी तक्रारही करण्याची हिम्मत दाखविली नाही.
 
अधिक वाचाः सावधान! उपचाराकरीता लांबच्या पल्ल्यावर जाताना वाचण्याची ‘गॅरंटी’ अजिबात नाय

राजकारणापायी विकास झाला भकास  
तिसऱ्यांदा ऑनलाइन निविदा त्याच शर्ती अटीसहित  निविदेत प्रकाशित केल्या असताना, मात्र त्यात चुका शोधून नियंमाचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करुन तिच निविदा रद्द करण्याचे निर्णय माजी स्थायी समितीने बहुमताने निर्णय घेतला. ती निविदा रद्द करण्यात यावी व मागील निविदा रद्द करावी असा निर्णय घेण्यात आला. ठरावात चुका असल्याचे कारण पुढे करुन बहुमताच्या जोरावर निविदा रद्द करणे कितपत योग्य आहे? त्यामुळे काही ठरावीक लोकांचे हित साध्य करण्याकरीता हा ठराव तर रद्द केला नाही ना, असा प्रश्न चर्चिला जात आहे. हा ठराव एकमताने स्थायी समितीने नामंजूर करुन नव्याने निविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे  दोनदा निविदा काढून आणि निविदा प्रकाशित करुनही या निविदेत तात्कालिन  स्थायी समितीला चुका, अटी, नियमांचे पालन केले नाही, हे दिसून आले नव्हते. पण  हाच ठराव स्थायी समितीच्या समोर येताच मात्र स्थायी समितीने ठरावात चुका शोधून ठराव नामंजूर केला. जर या ठरावात चुका होत्या, नवीन निविदा का आजपर्यंत काढण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे  या रस्त्याचे काम सुरु  झाले नाही. असा प्रकार नगरपंचायतच्या माध्यमातून  पारशिवनी शहराच्या विकासात बाधा निर्माण करण्याचे काम होत असताना शहराचा विकास मात्र भकास होण्यातच राजकारण सुरु असल्याच्या चर्चा आहेत. ठरावात चुका असल्याबाबत प्रतिक्रिया विचारल्या असता भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. मी आता उत्तर देऊ शकत नाही. सायंकाळी सांगतो, असे उत्तर तत्कालीन सभापती देवानंद वाकोडे यांनी सांगितले.

हेही वाचाः मंदिर कुलूपबंद, तरि अधिक मासात ‘झुंज’ बंधाऱ्यावर वाढली पर्यटकांची झुंड

ठराव नामंजूर करणे हे राजकारणच !
शासकीय नियमानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय वेळा या कामाची निविदा काढण्यात आली होती. कोणत्याही शर्ती, अटी, नियमांचे भंग केले नसताना ठराव नामंजूर करणे हा पारशिवनी शहरातील विकास कामात  राजकारण करुन माजी स्थायी समितीने शहरातील विकासकामात बाधा निर्माण करण्याचे काम केले आहे.  योग्य निविदा असताना स्थायी  समितीने निविदा रद्द ठरविल्याने तत्कालीन स्थायी समिती विरोधात नगराध्यक्षासह काही नगरसेवक, सेविकांनी बाजार चौक येथे निषेध सभा आयोजित केली व घटनेचा निषेध केला होता.
 दीपक शिवरकर
सत्तापक्ष गटनेते

...तर त्यांनी जाहीर माफी मागून राजीनामा दयावा !
माजी स्थायी समितीने ठराव नामंजूर केला, तो पूर्णतः चुकीच्या पध्दतीने. नियमांचे, अटी, शर्तींचे काटेकोरपणे पालन केले. शासकीय नियमानुसार निविदा प्रकाशित केली गेली. जर या ठरावात शर्ती, अटी, नियमांचे पालन केले नाही, असा आरोप माजी स्थायी समितीने केला आहे. त्या माजी स्थायी  समितीने ते सिद्ध करून दाखवावे. अन्यथा पारशिवनी शहराच्या विकासात बाधा निर्माण केल्याने पारशिवनी शहरवासींची जाहीर माफी मागून राजीनामा दयावा.
 प्रतिभा संजय कुंभलकर
नगराध्यक्ष

माझ्यासमोर सिद्ध करावे.  
 निविदा प्रकाशित करत असताना या निविदेत तंतोतत नियमांचे  पालन केले आहे.  एकदा नाही तर दोनदा निविदा प्रकाशित केली होती. कुठल्याही प्रकारच्या नियमांचा भंग निविदा प्रकाशित करताना केला नाही. जर नियमभंग अटी व शर्ती या निविदेत केल्याच्या आरोप माजी स्थायी  समिती करीत असेल तर  ते त्यांनी सिद्ध करावे. चुकीच्या पद्धतीने निविदा प्रकाशित केली, शर्ती अटीं व नियमांचे पालन केले नसेल तर ते माझ्यासमोर सिद्ध करावे.  
अर्चना वंजारी
मुख्याधिकारी

येणाऱ्या काळात त्यांची जागा त्यांना कळेल !
शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता रस्ते व नाल्या बांधकाम होणे महत्वाचे आहे. या कामात जर कुणी अडचणी निर्माण करीत असेल तर ते विकासाच्या विरोधात काम करणारे आहेत. जनता त्यांची जागा त्यांना येणाऱ्या काळात दाखवेल.
सागर सायरे  
बांधकाम व नियोजन सभापती
नगरपंचायत पारशिवनी

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers say, politics has gone to the pits, make the road first!