ग्रामस्थांना वाटतो वाघ, वनविभागाचे कर्मचारी म्हणतात, लांडगा आला रे आला....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

जाटलापूर येथील नामदेव महादेव कडू (वय 55) काल रात्री शौचास नदी तीरावर गेले होते. मागून पिसाळलेल्या लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमीला रात्री जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथे जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वेखंडे यांनी प्राथमिक औषधोपचार केले. या आधीच्या घटना या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या होत्या.

जलालखेडा (जि.नागपूर): नरखेड तालुक्‍यात गावांमध्ये वन्यप्राण्यांची दहशत आहे. तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी दिसण्याच्या व त्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारच्या दोन घटना रविवारी (ता.24) उघडकीस आल्या. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून यात दोन जण जखमी झाले आहे. ही घटना ताजीच असतानाच रविवारीच(ता.24) रात्री पुन्हा पिसाळलेल्या लांडग्याने एकाला जखमी केले. यामुळे नरखेड तालुक्‍यात "लांडगा आला रे आला!' अशी भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा  : अरे जरा ऐका रे ! होमक्‍वारंटाइन केलेल्यांनी उडविली प्रशासनाची झोप, मग प्रशासनाने केला उपाय....

आणखी एकाला केले जखमी
तालुक्‍यातील जाटलापूर येथील नामदेव महादेव कडू (वय 55) काल रात्री शौचास नदी तीरावर गेले होते. मागून पिसाळलेल्या लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमीला रात्री जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथे जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वेखंडे यांनी प्राथमिक औषधोपचार केले. या आधीच्या घटना या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या होत्या. या घटनेच्या वेळेत ही अंतर फार कमी असल्यामुळे दोन वेगळ्या प्राण्यांनी हल्ला करून जखमी केल्याचा अंदाज वनविभागाचा होता. तसेच हल्ला करण्याच्या पद्धतीने पाहिल्यास हल्ला करणारा वन्यप्राणी लांडगा असल्याचा संशय वनविभागाला होता. या नवीन घटनेनंतर पुन्हा हा लांडगा सक्रिय असल्याचे उघडकीस झाले आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्राण्यांच्या शोधात आहे. पण, त्यांना सध्या तरी यात यश आलेले नाही.

हेही वाचाः परवा प्रीतेश गेला, काल दत्तू...दोन्ही कामगारांच्या मृत्यूने कुटुंबीयांचे दुःख अनावर , मृत्यूचे कारण...

तो पिसाळलेला असल्याची शक्‍यता
रविवारी( ता.24) आणखी हल्ला होऊन एक जण जखमी झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पण, त्यांना प्राणी आढळून आले नाही. प्राण्याच्या पायाच्या चिन्हावरून तो लांडगा असल्याचे उघड झाले आहे. हा लांडगा पिसाळलेला असल्याचा संशय आहे व त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शेषराव तुले
वनपरिक्षेत्र अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers think the tiger, the forest department staff says, the wolf has come ....