'क्रेडिट शेल'च्या नावे विमान कंपनीकडून प्रवाशांची अडवणूक; 'वॉचडॉग'ने थोपटले दंड आणि... 

The Watchdog Foundation advocated for the rights of air passengers
The Watchdog Foundation advocated for the rights of air passengers

नागपूर : संयुक्त राष्ट्रांनी सूचना दिल्यानंतरही लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या विमान तिकिटांचा परतावा देण्यास विमान कंपन्यांकडून टाळटाळ सुरूच आहे. हजारो प्रवाशांचा परतावा "क्रेडीट शेल'च्या नावाखाली अडवून ठेवण्यात आला आहे. तिकिटांची रक्कम परत मिळावी यासाठी प्रवाशांचा एप्रिलपासून प्रयत्न सुरू आहे. नागपुरातील 50 प्रवाशांना अशाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराविरोधात मुंबईतील "वॉचडॉग फाउंडेशन'ने दंड थोपटले असून प्रवाशांच्या हक्कासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे विमान प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

विविध माध्यमांमधून मिळाणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीची दखल वॉचडॉग फाउंडेशन घेत असते. विमान प्रवाशांच्या संमतीशिवाय पैशांचा गैरवापर करणे ही आर्थिक लुबाडणूक आहे. अशाप्रकारे रक्कम आपल्याकडे जमा करून ठेवणे हे प्रवाशांच्या अधिकारांचे हनन करणारे असल्याची तक्रार या संस्थेने नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, नागरी विमानवाहतूक महासंचालनालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. 

नागपूरचे हरिहर पांडे यांनी लॉकडाऊनपूर्वी 17 मार्च रोजी 30 जुलैला उड्डाण भरणाऱ्या गो एअरच्या नागपूर-मुंबई विमानाचे 50 तिकिटांचे बुकिंग केले आहेत. 2 हजार 695 रुपये प्रतिसीट प्रमाणे 50 तिकिटांचे 1 लाख 34 हजार 750 रुपये गो एअरकडे जमा केले. 99 हजार रोख 35 हजार 750 रुपये क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट केलेले आहे. परंतु, आता गो-एअरने विमान रद्द झाल्याचे व तुमचे पैसे क्रेडीट शेलमध्ये ठेवल्याचे कळविले आहे. नव्याने तिकीट घ्यायचे झाल्यास अनेक पटींनी अधिक पैसे भरण्यास सांगितले जात आहे. 

प्रवाशांनी स्वतःहून तिकीट रद्द केले तर गो-एअर कॅन्सलेशनच्या नियमानुसार पैसे ठेवून रद्द करते. विमान जर रद्द झाले तर स्वतःहून पैसे परत दिले पाहिजे. "क्रेडीट शेल'च्या नावावर भविष्यात गरज नसताना ग्राहकांवर विमान प्रवास थोपविणे, रद्द होत असलेल्या तिकिटांचे पैसे प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध वर्षभर बिनव्याजी वापरणे, पुन्हा प्रवासाची सक्ती करणे, अशाप्रकारे 50 प्रवाशांची आर्थिक कोंडी करून त्यांची लुबाडणूक करणे, हे उचित नसल्याचे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. "वॉचडॉग फाउंडेशन'कडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल नागपूरचे हरिहर पांडे यांनी आभार मानले आहे. 
 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे विमान कंपनीला पत्र 


क्रेडीट शेलच्या नावाखाली प्रवाशांच्या अडवणुकीसंदर्भात माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गो एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांना पत्र पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली आहे. प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सहकार्यासाठी हरिहर पांडे यांनी गडकरी यांचे आभार मानले आहेत. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com