चौकीदारच निघाला `चोर'; मालकाचा परस्पर विकला प्लॉट

मंगेश गोमासे 
Friday, 23 October 2020

प्रमोद शंकर डोंगरे (रा. पांडुरंगनगर, ठाकरे लेआऊट, प्लॉट नं. ४७,) असे प्लॉटवर कार्यतर चौकीदार असलेल्या आरोपीचे नाव आहे. राजवीर शिवनारायण यादव, सुदेशना विनायक गेडाम असे त्याचे दोन आरोपी साथीदारांची नावे आहेत.

नागपूर ः चौकीदारच चोर निघाल्याची घटना एमआयडीसी हद्दीत उघडकीस आली. येथे एका प्लॉटवर चौकीदार म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या मदतीने सदर प्लॉटचे अन्य एका महिलेच्या नावे विक्रीपत्र लावून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले.

प्रमोद शंकर डोंगरे (रा. पांडुरंगनगर, ठाकरे लेआऊट, प्लॉट नं. ४७,) असे प्लॉटवर कार्यतर चौकीदार असलेल्या आरोपीचे नाव आहे. राजवीर शिवनारायण यादव, सुदेशना विनायक गेडाम असे त्याचे दोन आरोपी साथीदारांची नावे आहेत. सिनु बुधराम होरो (५६) रा. हुलसु बटकाटोली, राची, झारखंड असे फिर्यादीचे नाव आहे.

 प्रााप्त माहितीनुसार, फिर्यादीचे एमआयडीसी हद्दीतील पांडुरंगनगर, ठाकरे लेआऊट येथे प्लॉट नं. ४७ आहे. सदर प्लॉटवरील चौकीदार प्रमोद याने साथीदार यादव याच्याशी संगणमत करुन कु. सुदेशना हिच्या नावे विक्रीपत्र लावल्याची बाब समोर आली.

 याकरीता तिघांही संगणमत करुन बनावट कागदपत्राचा वापर केल्याचे समोर आले. ही बाब फिर्यादी होरो यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
..
संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watchman sold owner plot without knowing him