रानभाजी महोत्सवाकडे आदिवासी, शेतकऱ्यांचीच पाठ, असे काय झाले?

चंद्रकांत श्रीखंडे
Monday, 10 August 2020

अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांविषयी सर्वांना ओळख व्हावी, विक्रील चालना मिळावी, आाधुनिक काळात या रानभाज्यांचे महत्व कमी होवू नये, आादिवासीं, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधण निर्माण व्हावे, त्यांना बाजारपेठ रोजगार मिळावा या उद्देशाने शासनाने या महोत्सवाचे आायोजन रविवारी जागतिक आादिवासी दिनानिमीत्त राज्यभर केले. परंतू कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाची साधी माहितीसुद्धा आादिवासी, शेतकऱ्यांना देण्यात आाली नाही.

कळमेश्वर (जि.नागपूर):  रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या अध्यादेशानुसार आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑॅगस्ट रोजी रानभाजी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने कळमेश्वर येथेही आयोजन करण्यात आले होते. परंतू कार्यक्रमाचा गाशा गुंडाळावा लागला.या प्रकारामुळे कृषी विभागावर नामुष्कीची वेळ आली.

अधिक वाचा  :  तपासणी न करताच निघाला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, काय झाले असे...

शेतकऱ्यांची उपस्थितीच नसल्याने गाशा गुंडाळला
कळमेश्वर तहसील कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने रविवारी (ता.९) रानभाजी महोत्सवाचे आायोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पशुसंवर्धन व दुग्ध मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. केदार यांच्यासोबत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्तेच मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी हजर होते. परंतू कार्यक्रमाला मात्र आादिवासी व शेतकऱ्यांची अनुपस्थिती होती.

अधिक वाचा :कृषी विभाग म्हणतो, रानभाज्या खा आणि तंदुरूस्त राहा !

उद्देश चांगला, मात्र आयोजन ढेपाळले
अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांविषयी सर्वांना ओळख व्हावी, विक्रील चालना मिळावी, आाधुनिक काळात या रानभाज्यांचे महत्व कमी होवू नये, आादिवासीं, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधण निर्माण व्हावे, त्यांना बाजारपेठ रोजगार मिळावा या उद्देशाने शासनाने या महोत्सवाचे आायोजन रविवारी जागतिक आादिवासी दिनानिमीत्त राज्यभर केले. परंतू कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाची साधी माहितीसुद्धा आादिवासी, शेतकऱ्यांना देण्यात आाली नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे शासनाच्या या स्तुत्य उपक्रमालाच या विभागाकडून हरताळ फासला गेला. कार्यक्रमाला सोशल डिस्टनींग व परिसर निर्जंतुकीकरणाचासुद्धा अभाव दिसून आला.

३५ ते ४० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
आायोजीत कार्यक्रमात १० ते १२ प्रकारच्या रानभाज्यांची नमुने कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनात आाणले होते. पशुसंवर्धन व दुग्धमंत्री सुनील केदार केदार यांच्यासोबत ३५ ते ४० पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. परंतू महोत्सवात बोटावर मोजण्याइतपत आादिवासी वा शेतकरी बांधव आपले नमुने घेऊन उपस्थित होते.  
 
संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to Ranbhaji Mahotsav?