
मधुमेहावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेहींसाठी ही धोक्याची घंटा आहे. मधुमेहींनी नियमित औषधे घ्यावीत. औषध मिळत नसल्यास मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांना फोन लावा, जेणेकरून औषध उपलब्ध नसल्यास ते औषध बदलून देता येईल. टाईप वन मधुमेहींसाठी भारतीय मधुमेह संघटनेतर्फे लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे, असे डॉ. गुप्ता म्हणाले.
नागपूर : कोरोना विषाणूचा आजार संसर्गजन्य आहे. कोणालाही, कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मधुमेही व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अशा व्यक्तींना अधिक जोखीम असते. भारतात १० पैकी ७ लोकांना अनियंत्रित शुगर आहे, यांच्या फुफ्फुसात लवकर संसर्ग होतो. यामुळे कोरोनापासून बचावासाठी मधुमेहींनी अधिक काळजी घ्यावी.
कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात ज्या रुग्णाचा पहिला मृत्यू झाला त्याला मधुमेह होता. चीन तर मधुमेहींची राजधानी आहे. भारतात साडेसात कोटी मधुमेही आहेत, त्यांची रोग प्रतिकारशक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे त्यांना जर अशा प्रकारच्या विषाणूची लागण झाल्यास त्यामुळे गुंतागुंत वाढून नागरिक तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार असणाऱ्या व्यक्तींनी या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
टाईप वन मधुमेहींसाठी हेल्पलाइन
मधुमेहावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेहींसाठी ही धोक्याची घंटा आहे. मधुमेहींनी नियमित औषधे घ्यावीत. औषध मिळत नसल्यास मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांना फोन लावा, जेणेकरून औषध उपलब्ध नसल्यास ते औषध बदलून देता येईल. टाईप वन मधुमेहींसाठी भारतीय मधुमेह संघटनेतर्फे लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे, असे डॉ. गुप्ता म्हणाले.
- या शहरातील चक्क नऊ डॉक्टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत..
ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
- ताप येणे
- घशाला कोरड
- अंग दुखणे
- सर्दी होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
अशी घ्या काळजी
- संतुलित आहार घेणे,
- गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे.
- संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरावा.
- वेळोवळी हात धुवावे.
- सॅनिटायझरचा वापर करावा.
- खोकताना, शिंकताना नाकावर तसेच तोंडावर रुमाल ठेवावा.
- आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळा.
शारीरिक स्वच्छता राखणे गरजेचे
चीनमध्ये मधुमेही रुग्णांमध्ये अन्य नागरिकांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणं आढळून आली असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. त्यामुळे सध्या मधुमेही रुग्णांनी प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तोंडाला मास्क लावावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी व खोकला अधिक काळ असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.
- डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केअर फाऊंडेशन