या शहरातील चक्‍क नऊ डॉक्‍टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत...

Nine medical doctors quarantine at Nagpur
Nine medical doctors quarantine at Nagpur

नागपूर : देशात कोरोना व्हायरसने दस्तक दिल्यानंतर उपाययोजनांना सुरुवात झाली. देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात पहिला रुग्ण आढळल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. भारतात कोरोना शिरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू केले. सर्व उपाययोजन केल्यानंतरही एकट्या नागपूर शहरात 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशाच एका रुग्णाच्या संपर्कात आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) नऊ डॉक्‍टरांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार सुरू आहे. या रुग्णाचा भाऊ कोरोना पॉझिटीव्ह निघाला होता. मात्र, या रुग्णाने ही माहिती सर्वांपासून लपवून ठेवल्याने त्याच्यावर सर्वसाधारण रुग्णाप्रमाणे उपचार करण्यात आले. त्याला सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले होते. 

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिका, डॉक्‍टर आणि इतर व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. त्यांना कोरोनाची लागण तर झाली नाही ना याची तपासणी केली जात आहे. खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयातील नऊ डॉक्‍टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. सध्या नागपुरात कोरोना व्हायरसचे 16 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी बरे झालेल्या चार रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

खबरदारी म्हणून घेतला हा निर्णय

अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आला. या रुग्णाच्या भावाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती लपविण्यात आली. कोरोना पॉझिटीव्ह भावाविषयीची माहिती लपवून ठेवल्याने नऊ डॉक्‍टरांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. 

रुग्ण व पत्नीही पॉझीटीव्ह

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतल्यानंतर त्याच्या भावावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजले. त्याची कोरोना चाचणी केली असता रुग्ण आणि पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह निघाली. यामुळे हा विषय चांगलाच चर्चेला जात आहे.

दोन रुग्णांची भर

कालपर्यंत नागपुरात कोरोना व्हायरचे एकूण 14 रुग्ण आढळून आले होते. यातील चार रुग्णांना योग्य उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. उर्वरित दहा रुग्णांवर उपचार सुरू असताना आज आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. माहिती लपविण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com