पांढरे डाग का पडतात?जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

शरीरावरील पांढर डाग हा जन्मतः नसतो. सर्वसाधारण आयुष्य जगत असताना कधीतरी शरीराच्या एखाद्या भागावर पांढरा डाग आढळतो आणि तो माणूस हबकूनच जातो. यामुळेच या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने 25 जून हा जागतिक कोडदिन अर्थात जागृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नागपूर : समाज मनापेक्षा शारीरिक सौंदर्याला महत्त्व देणारा असतो. तुमच्या दिसण्यावरच समाजाचा तुमच्याशी व्यवहार ठरत असतो. त्यातच एखादी शारीरिक विकृती आली की समाजाच्या नजराच बदलतात. आणि त्या माणसाला जगणे नकोसे करतात. शरीरावरील पांढरे डाग किंवा कोड (विटिलिगो) हा फारच काही जगावेगळा प्रकार नाही. तो संसर्गजन्य नाही. पांढरे डाग असणारा माणूस इतर सर्वसाधारण आयुष्य असलेल्या माणसांपेक्षा अजिबात वेगळा नाही. परंतु, त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन निराळाच असतो. डाग असलेल्या व्यक्तीकडे समाज अशा नजरेने पाहतो की, या नजरेने मनाला होणाऱ्या जखमा सहन करणे कठीण असते. हा एकप्रकारचा त्वचाविकार असून जगात एकूण लोकसंख्येच्या एक तर भारतात तीन ते चार टक्के लोकांना हा विकार असल्याची माहिती आहे.

शरीरावरील पांढर डाग हा जन्मतः नसतो. सर्वसाधारण आयुष्य जगत असताना कधीतरी शरीराच्या एखाद्या भागावर पांढरा डाग आढळतो आणि तो माणूस हबकूनच जातो. यामुळेच या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने 25 जून हा जागतिक कोडदिन अर्थात जागृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम 2011 साली हा दिवस पाळला गेला. प्रसिद्ध नर्तक मायकल जॅक्‍सन हा या आजाराने ग्रस्त होता. त्याचे निधन 25 जून 2009 रोजी झाले. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला.

हा आजार अनुवंशिक नाही. शरीरातील काळ्या पेशी, त्यांचे रंग तयार करण्याचे काम बंद करतात. त्यामुळे त्या भागावरील त्वचा पांढरी दिसते. प्रमाणानुसार त्याची संख्या कमी-जास्त असते. मधुमेही व थॉयराइडच्या रुग्णांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते, असे मेडिकलच्या त्वचाविकार विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय मुखी म्हणाले.

सविस्तर वाचा - आता तुकाराम मुंढेंना करणार नगरसेवक बदनाम, हा घेतला निर्णय

मेलानिनचे कार्य
शरीरावर त्वचा, अंतत्वचा आणि बाह्यत्वचा असे आवरण असते. त्यात अनेक थर असतात, या थरांमध्ये मेलानोब्लास्ट नावाच्या पेशी असतात. त्यापासुन मेलानोसाईट नावाच्या पेशी तयार होतात, त्या मेलानिन नावाचे रंगद्रव्य तयार करत असतात. मेलानिन नावाच्या रंग देणाऱ्या पेशींमुळे आपल्याकडे गव्हाळी अथवा सावळा रंग त्वचेला येतो. योग्य रीतीने त्वचेला रंग देण्यासाठी पुरेशे मेलानिन युक्त मेलानोसाईट नावाच्या पेशी असणे गरजेचे आहे. पांढरेडाग हे खालील सर्वसामान्य स्थितीत मेलानिनचे प्रमाण कमी होते व त्वचा पांढरी दिसू लागते.
डॉ. अजय मुखी, सहयोगी प्राध्यापक, त्वचारोग विभाग, मेडिकल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a reason of white spots?