सध्या काय करताहेत स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक?...

मंगेश गोमासे
रविवार, 12 जुलै 2020

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयासह शहरातील महापालिकेच्या विविध वाचनालयात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. या ग्रंथालयात अभ्यास करताना समूह चर्चा आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय विविध उपयुक्त पुस्तके आणि वातावरण उपलब्ध होत असतात. या अभ्यासातून आजवर सरकारी नोकऱ्यांसाठी विविध विभागाद्वारे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ऑनलाइन शिक्षण महत्वपूर्ण ठरत असले तरी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांना या वातावरणाचा मोठा फटका बसतो आहे. टाळेबंदीमुळे शहरातील प्रमुख ग्रंथालये आणि वाचनालये बंद झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच टाच आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तीन महिन्यापासून सातत्याने अभ्यास हात नसल्याने विद्यार्थ्यांचा सराव कमी होत चालला असून दुसरीकडे परीक्षात होत नसल्याने मानसिकतेतही बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयासह शहरातील महापालिकेच्या विविध वाचनालयात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. या ग्रंथालयात अभ्यास करताना समूह चर्चा आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय विविध उपयुक्त पुस्तके आणि वातावरण उपलब्ध होत असतात. या अभ्यासातून आजवर सरकारी नोकऱ्यांसाठी विविध विभागाद्वारे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...
 
मात्र, मार्च महिन्यापासून राज्यासह देशभरात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे महाविद्यालय, विद्यापीठांसह महापालिकेतील वाचनालयेही बंद झालीत. वाचनालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास जवळपास बंद झाला. स्पर्धा परीक्षेत समूह चर्चेला अतिशय महत्व असल्याने विद्यार्थ्यांमधील संवाद जवळपास कमी झाला आहे. तसेच पुस्तक खरेदी बंद असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्‍यक असलेली पुस्तके मिळणे अशक्‍य होत आहेत. शिवाय इतर कामे बंद झाल्याने इंटरनेटसाठी आवश्‍यक असलेला पैसे नसल्यानेही विद्यार्थ्यांवर मर्यादा आल्या आहेत.

परीक्षा लांबणीवर
देशात भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्‍शन बोर्ड, रेल्वेतील एनटीपीसी ग्रुप डीसह इतर स्पर्धात्मक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. याशिवाय राज्यातही सध्या भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. यामुळेही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मुड गेला आहे. यात टाळेबंदीमुळे समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे.

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि देशात होणारे खाजगीकरण यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बाजारात जरी गर्दी दिसुन आली तरिही शैक्षणीक संस्था व विद्यार्थांसाठी उपयुक्त ठरणारे वाचनालय आणि अभ्यासिका सध्या बंद आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाचे वातावरण जवळपास नाहीसे झाले आहे.
सुबोध चहांदे
स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the status of competitive exam practitioners?