esakal | पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Chance of heavy rain in Vidarbha after Tuesday

दमदार पावसामुळे विदर्भात अर्ध्याअधिक पेरण्या झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पाऊस अचानक बेपत्ता झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. परिणामत: शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस बरसल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता विदर्भात सगळीकडेच उघडीप दिली. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची दाट शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारनंतर नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. 

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारनंतर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता आहे. विशेषत: नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - तुकाराम मुंढे राजाश्रयामुळेच शिरजोर

दमदार पावसामुळे विदर्भात अर्ध्याअधिक पेरण्या झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पाऊस अचानक बेपत्ता झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. परिणामत: शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. वरुणराजा बरसल्यास पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. जोरदार पावसाअभावी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या धानपट्ट्यातही रोवण्या थांबल्या आहेत. दडी मारून बसलेला वरुणराजा पुन्हा मंगळवारनंतर विदर्भात बरसण्याची दाट शक्‍यता आहे. 

तूट भरून निघण्याची शक्‍यता

मॉन्सून दाखल झाल्यापासून गोंदिया, यवतमाळ व अकोल्याचा अपवाद वगळता विदर्भात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 29, 21 व 18 टक्‍के कमी पाऊस पडलेला आहे. वाशीम व बुलडाणा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. आगामी काळात दमदार पाऊस अपेक्षित असल्यामुळे तूट भरून निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

विदर्भातील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)     
जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस
नागपूर 255 मिमी 278 मिमी 
वर्धा 251 मिमी 241 मिमी 
अमरावती 224 मिमी 235 मिमी 
भंडारा 294 मिमी 284 मिमी 
गोंदिया 311 मिमी 221 मिमी 
अकोला 197 मिमी 162 मिमी 
वाशीम 231 मिमी 324 मिमी 
बुलडाणा 196 मिमी 248 मिमी 
यवतमाळ 233 मिमी 183 मिमी 
चंद्रपूर 278 मिमी 288 मिमी 
गडचिरोली 316 मिमी 314 मिमी 


संपादन - नीलेश डाखोरे