रेशनदुकानातील गहू, तांदूळ निकृष्ट दर्जाचे

नीलेश डोये
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रेशनदुकानातून मिळणारे गहू, तांदूळ हे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांनी खावे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे हे धान्य चागले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नागपूर ः लॉकडाउनमुळे अनेकांचा व्यवसाय गेला. जेवहाचा प्रश्‍न निर्माण झाला. सरकारने मदतीचा हात पुढे करीत रेशनदुकानातून स्वस्तात धान्य देण्याची येजना सुरू केली. रेशनदुकानातून मिळणारे गहू, तांदूळ हे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांनी खावे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे हे धान्य चागले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका गरीब, शेतकरी आणि मजूरांना बसला आहे. शहरातील सर्व व्यवहार थांबवण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. अशातच ज्याचे हातावर पोट आहे अशा लोकांना अन्न- धान्य मिळणे अवघड झाले होते. अशा लोकांच्या मदतीला सरकार धावून आले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पूर्वी तीन महिने व आता त्यामध्ये वाढ करीत नोव्हेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांशी थट्टा...  कर्जाच्या रकमेपेक्षा बॅंकेत जमा झाली कमी रक्कम 

याअंतर्गत कुटुंबातील प्रती व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत देण्याचे यात नियोजित आहे. या योजनेचा देशातील 80 कोटी नागरिकांना याचा लाभ होणार असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना आधीच पाच किलो तांदूळ किंवा गहू दिले जात होते.

त्यात आता पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार आहे. याशिवाय एक किलो डाळही मोफत दिली जाणार असे सांगण्यात आले होते. या योजनेचा नागपूर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 20 लाखाहून अधिक नागरिकांना लाभ मिळणार आहे. परंतु रेशनदुकानातील गहू काळपट आहे. तांदळाचा दर्जाही चांगला नाही. निकृष्ट व दर्जाहिन धान्य देवून एक प्रकारे त्यांच्या आरोग्याशी खेळण्यात येत आहे.

 धान्य चांगल्या दर्जाचे
फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून गहू व तांदळाचा पुरवठा झाला आहे. तोच रेशनदुकानात आहे. हे धान्य चांगल्या दर्जाचे आहे.
अनिल सवई, अन्न- धान्य वितरण अधिकारी, नागपूर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wheat and rice in the ration shop are of inferior quality