दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा कधी ?

मंगेश गोमासे
Thursday, 23 July 2020

दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळते. मात्र, यंदा करोनामुळे विद्यापीठ परीक्षा रद्द झाल्या. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिने उशिरा जाहीर झाला. तर, दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल मे ऐवजी जुलै महिन्यात जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल जाहीर करताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असणारी फेरपरीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात येते. मात्र, दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणारी फेरपरीक्षा कधी होणार याच्या तारखा मंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा फेरपरीक्षा कधी याबाबत शंकांना उत आले आहे. विशेष म्हणजे परीक्षा होतील याबाबत शक्‍यता कमी असल्याची चिन्हे आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळते. मात्र, यंदा करोनामुळे विद्यापीठ परीक्षा रद्द झाल्या. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिने उशिरा जाहीर झाला. तर, दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, कुणी केली ही मागणी

त्यामुळे ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेणे शक्‍य नाही. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातदेखील या परीक्षांचा उल्लेख नाही. त्यामुळे या परीक्षा पुन्हा ऑक्‍टोबर होण्याची शक्‍यता असून, शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळणार नाही. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात, तूर्तास फेरपरीक्षेचा कोणताच निर्णय विचारात नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

दहावीचा निकाल महिनाअखेर
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत दहावीचा जाहीर केला जातो. यंदा करोनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विलंबाने होत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When is the 10th-12th re-examination?