नागपूर केव्हा होणार स्मार्ट?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांतर्गत नागपूर सेफ अँन्ड स्मार्ट सिटी आणि किऑस्क हे दोन प्रकल्प पूर्ण झाले आहे. सेफ अँन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पात आतापर्यंत 1800 गुन्हे उघडकीस आले आहे. यात 90 खूनांचा समावेश आहे. काही अपहरणाच्या घटना, लुटमार आदी प्रकरणेही या प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आले आहे. सध्या पारडी, पूनापूर व भरतवाडा येथे क्षेत्राधिष्ठीत विकासअंतर्गत काम सुरू आहे. 1730 एकरमध्ये प्रारूप नगररचना परियोजना सुरू आहे.

नागपूर : नागपूर शहराचे काम अत्यंत स्मार्ट असल्याचे प्रशस्तीपत्रक केंद्रीय नगर विकास विभागाने दिले आहे. न्यायालयीत प्रक्रियेअंतर्गत काही अडचणी आल्याने स्मार्ट सिटीचा 254 कोटींचा निधी पडून आहे. आतापर्यंत 196 कोटी खर्च झाले आहे. एकूण 21 प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा कालावधी जून, 2021 पर्यत आहे अशी माहिती स्मार्ट सिटीचे मावळते सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी अनौपचारीक चर्चेत दिली. स्मार्ट सिटीचा कालावधी वाढण्याचेही संकेतही त्यांनी दिले.

अवश्य वाचा - काच फोडली, नस कापली...अन्‌ पुढे

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांतर्गत नागपूर सेफ अँन्ड स्मार्ट सिटी आणि किऑस्क हे दोन प्रकल्प पूर्ण झाले आहे. सेफ अँन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पात आतापर्यंत 1800 गुन्हे उघडकीस आले आहे. यात 90 खूनांचा समावेश आहे. काही अपहरणाच्या घटना, लुटमार आदी प्रकरणेही या प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आले आहे. सध्या पारडी, पूनापूर व भरतवाडा येथे क्षेत्राधिष्ठीत विकासअंतर्गत काम सुरू आहे. 1730 एकरमध्ये प्रारूप नगररचना परियोजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत या भागाचा नियोजनब्ध्द विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत 11393 कुटंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील 80 टक्के कुटुंबांनी सर्वेक्षणात घर, जमीन देण्यास सहमती दर्शविली. यातील 2000 कुटुंब पूर्ण वा अंशत: बाधीत आहे. त्यांच्यासाठी या भागात ईडब्लूएस, एलआयजी, एमआयजी या तीन टप्पयात घरकुल बांधकाम करण्यात येत आहे. न्यायालयीन प्रकल्प प्रलंबीत असल्याने स्मार्ट सिटीचे काम प्रलंबीत आहे. शिवाय, एक दिवस पाऊस आल्याने या भागात असलेल्या काळया मातीतमुळे आठवडाभर काम रखडत असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

या भागातील लोकांना विश्वासात घेऊन, जमीन संपादनाचे काम करावे लागते आहे. जून, 2021 हा स्मार्ट सिटीचा कालावधी आहे. देशातील अनेक शहरात अद्याप नियोजनाचे कामच प्राथमिक स्तरावर असल्याने या मिशन कालावधीला मुदतवाढ मिळेल, अशी शक्‍यता डॉ. सोनवणे यांनी वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will Nagpur be smart?