बघा, कधी येणार विद्यापीठाच्या सेमिस्टरचे निकाल ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

या सेमिस्टरमध्ये "बॅक' विषय असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, इतर सेमिस्टरमध्ये जे विद्यार्थी "क्‍लीअर' आहेत, त्यांना ऍव्हरेज गुण देत उत्तीर्ण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. 

नागपूर : कोरोनामुळे विद्यापीठांच्या सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र, आता सर्वच विद्यापीठांवर निकाल लावण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कंबर कसली असून 25 जुलैपर्यंत सेमिस्टरच्या परीक्षांचे निकाल लावण्यावर विद्यापीठाने भर दिला आहे. मात्र, यात अंतिम वर्षाच्या निकालाचा समावेश राहणार नाही.

"बॅकलॉग' असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा स्पष्ट आदेश अद्याप आला नसल्याने अंतिम वर्षाचा निकाल "होल्ड'वर ठेवण्यात आल्याचे समजते. 
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून विद्यापीठाचे कामकाज पाच टक्‍के कर्मचाऱ्यांवर असून महाविद्यालये बंद करण्यात आलीत.

यामुळे परीक्षांवर त्याचा परिणाम होऊन सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्यात. शिवाय राज्य सरकारकडून परीक्षा घेण्याऐवजी ऍव्हरेज गुण देत, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या विभागाकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाही.

वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे...

या सेमिस्टरमध्ये "बॅक' विषय असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, इतर सेमिस्टरमध्ये जे विद्यार्थी "क्‍लीअर' आहेत, त्यांना ऍव्हरेज गुण देत उत्तीर्ण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. 
 
असे तयार होतील निकाल 
विद्यापीठाकडून निकाल तयार करण्याची प्रक्रिया दोन भागात आहे. एका भागात महाविद्यालय विद्यार्थ्यांचे आंतरिक गुण विद्यापीठाला पाठवित आहे. दुसऱ्या भागात विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या मागील सेमिस्टरमधील गुणाच्या आधारावर सरासरी काढत आहे. प्रभारी प्र-कुलगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाकडे फॉर्म्यूला तयार असून तो प्रणालीत टाकताच, विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज गुण मिळणार आहे. त्यातूनच पुढच्या पंधरा दिवसात विद्यार्थ्यांचे निकाल येणास सुरुवात होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the university semester result come?