कोण आहेत नागपूरचे पालनकर्ते? यांनी मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

जिल्ह्यात एकूण तीन कॅबिनेट मंत्री असल्याने पालकमंत्रीपदासाठी चुरस होती. यावर तोडगा म्हणून ज्या पक्षाचे जास्त मंत्री त्या पक्षाला पालकमंत्री देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. नागपूरमध्ये कॉंग्रेसचे नितीन राऊत आणि सुनिल केदार असे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. आपसातील वाद टाळण्यासाठी बाहरेच्या जिल्ह्यातील मंत्र्याला पालकमंत्री केले जाईल अशी चर्चा होती. मात्र नितीन राऊत यांनी बाजी मारली.

नागपूर : राज्य शासनाने पालकमंत्री जाहीर केले असून यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बाजी मारली आहे. त्यांना नागपूरचे पालकमंत्री करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांना वर्धा तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना गोंदियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात

जिल्ह्यात एकूण तीन कॅबिनेट मंत्री असल्याने पालकमंत्रीपदासाठी चुरस होती. यावर तोडगा म्हणून ज्या पक्षाचे जास्त मंत्री त्या पक्षाला पालकमंत्री देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. नागपूरमध्ये कॉंग्रेसचे नितीन राऊत आणि सुनिल केदार असे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. आपसातील वाद टाळण्यासाठी बाहरेच्या जिल्ह्यातील मंत्र्याला पालकमंत्री केले जाईल अशी चर्चा होती. मात्र नितीन राऊत यांनी बाजी मारली.

वडेट्टीवार चंद्रपूरचे पालकमंत्री

आघाडीच्या काळात मंत्री असताना नितीन राऊत यांना यवतमाळचे पालकमंत्री करण्यात आले होते. त्यांच्याऐवजी यवतमाळचे शिवाजीराव मोघे नागपूरचे पालकमंत्री होते. काही वर्षे बाळासाहेब थोरात हेसुद्धा नागपूरचे पालकमंत्री होते. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री विकासासाठी फारसे आग्रही नसतात. बैठकांची फक्त औपचारिकाता पार पडतात, असे आरोप त्यावेळी झाले होते. स्थानिक नेत्यांनाच पालकमंत्री करण्यात यावे असा आग्रह नेत्यांचा होता.अनिल देशमुख यापूर्वीसुद्धा गोंदिया आणि अमरावतीचे पालकमंत्री होते. सुनिल केदार प्रथमच पालकमंत्री झाले आहेत. दुय्यम खाती मिळाली म्हणून नाराज असलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरचे पालकमंत्री करण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who are the followers of Nagpur? The bet