esakal | पदवीधर मतदारसंघ निवडणूक : गडकरींचा वारसदार कोण; अनिल सोले की संदीप जोशी?
sakal

बोलून बातमी शोधा

who is bjp candidate from nagpur graduation constituency

नागपूरच्या पदवधीर मतदारसंघात आजवर भाजपचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार येथून निवडून आलेला नाही. गडकरी यांची राजकीय कारर्कीदच या निवडणुकीने घडविली. त्यांचे वारसदार म्हणून अनिल सोले यांनी हा मतदारसंघ भाजपकडे शाबूत ठेवला. मात्र, संदीप जोशी यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : गडकरींचा वारसदार कोण; अनिल सोले की संदीप जोशी?

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली. गडकरी यांचा वारसदार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले यांच्यासोबत महापौर संदीप जोशी यांच्या नावाची येथून जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना आधीच हिरवा झेंडा दाखवला. आता आणखी किती उमेदवार रिंगणात उडी घेतात? यावरच विजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे. 

नागपूरच्या पदवधीर मतदारसंघात आजवर भाजपचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार येथून निवडून आलेला नाही. गडकरी यांची राजकीय कारर्कीदच या निवडणुकीने घडविली. त्यांचे वारसदार म्हणून अनिल सोले यांनी हा मतदारसंघ भाजपकडे शाबूत ठेवला. मात्र, संदीप जोशी यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्यास तयार आहे, असे सांगून जोशी यांनी आपले इरादे स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा कौल यंदा मिळेल असा विश्वासही त्यांना आहे. 

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

काँग्रेसतर्फे प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी भाजपला दोनवेळा येथून जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. आता तरुण दमाचे अभिजित वंजारी तयारीला लागले आहेत. विदर्भाच्या मुद्द्यावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनीही निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. आम आदमी पार्टी आणि बसपच्या समर्थनासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट परिवर्तन पॅनेलचे प्रशांत डेकाटे यांनीही तयारी चालविली आहे. बसपने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव पुढे केलेले नाही. अनेक संघटना आणि आघाड्यांचेही उमेदवार इच्छुक असल्याने यंदा ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

हेही वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

ऑनलाईनची नोंदणीच नाही? 
निवडणुकीसाठी अनेक मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली. निवडणूक जाहीर असली तरी त्यांची नावे प्रलंबितच आहे. सध्या १ लाख १३ हजार मतदारांची नावे यादीत आली आहेत. ऑनलाईन नोंदणीच्या नावांचा समावेश केला नाही, तर अनेकांचे समीकरण बिघडू शकते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नोंदणी केली असल्याने अंतिम यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

अशी होईल निवडणूक - 

  • उमेदवारी अर्ज दाखल - ५ ते १२ नोव्हेंबर 
  • छाननी - १३ नोव्हेंबर 
  • अर्ज मागे घेण्याची मुदत - १७ नोव्हेंबर 
  • मतदान - १ डिसेंबर
  • मतमोजणी - ३ डिसेंबर

संपादन - भाग्यश्री राऊत