मॉलमध्ये नेमकी कोणाची होते गर्दी...काय आहे त्यामागचे कारण

Who exactly was the crowd at the mall ... the reason behind what was
Who exactly was the crowd at the mall ... the reason behind what was

नागपूर : चकचकीत मॉलमध्ये श्रीमंत तसेच सुशिक्षित महिलाच अधिक जात असतील, असा सर्वसामान्य समज असतो. मात्र, त्याला छेद देणारे वास्तव संशोधनतातून पुढे आले. मॉलमध्ये सर्वाधिक खरेदी गृहिणी करीत असून, नोकरदार महिला किराणा व जनरल स्टोअर्सला पसंती देतात. यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. परंतु, डॉ. मयूरा कथने यांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली.


आजच्या धकाधकीच्या जीवनात एकाच्या मिळकतीतून घर चालविणे शक्‍य नाही. त्यामुळे घरातील महिलाही आज कामासाठी बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी तिच्याकडे कमी वेळ आहे. पहाटे लवकर उठून स्वयंपाक आणि घर सावरत त्या कामाला जातात. कामामुळे वेळ अपुरा पडत असल्याने कार्यरत महिलांनी ही तडजोड स्वीकारल्याचे दिसते. डॉ. मयूरी कथने यांनी पीएच.डी.साठी "प्रक्रिया खाद्यपदार्थाचा नागपुरातील कार्यरत व गृहिणी महिलांवर पडणाऱ्या परिणामाचा तुलनात्मक अभ्यास' या शोधप्रबंधात प्रक्रिया पदार्थांचे सेवन गृहिणींच्या कुटुंबातील मुलांपेक्षा कार्यरत महिलांच्या कुटुंबातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळले. तसेच प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खरेदी करण्यास गृहिणी महिला मॉल आणि सुपर स्टोअरला तर कार्यरत महिला स्थानिक किराणा स्टोअरला प्राधान्य देत असल्याचे निष्कर्षात आढळले.

खाद्यपदार्थही तयार करण्याचा कंटाळा

दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या प्रक्रिया खाद्यपदार्थांवर प्रश्‍नमालिका तयार करून त्याद्वारे महिलांकडून माहिती घेतली. माहितीनुसार बेकरी उत्पादने, न्याहारी व तृणधान्ये, इन्स्टंट मिक्‍स, पापड आणि चिप्स तसेच लोणचे आणि सॉस या पाच भागांत विभाजन केले गेले. प्रत्येक विभागात ज्या प्रक्रिया पदार्थांना बनवण्यात वेळ, मेहनत किंवा विशेष कौशल्य लागते, असे पदार्थ महिला बाहेरून विकत घेण्यास जास्त प्राधान्य देताना आढळून आले. यात बेकरीतील उत्पादनात ब्रेड, नाश्‍त्यामध्ये कॉर्न फ्लेक्‍स तसेच नूडल्स, गुलाबजाम इन्स्टंट मिक्‍स पदार्थांमध्ये, मूग पापड, आलू चिप्स, आंबा लोणचे आणि टोमॅटो सॉस सर्वाधिक लोकप्रिय आढळून आले.

अशी आहेत कारणे

एकविसाव्या शतकात आपल्या जीवनशैलीत होणारे बदल, नोकरीत महिलांचा वाढलेला टक्का, वाढत चाललेली विभक्त कुटुंब पद्धती, महिलांमधील शिक्षणाचे तसेच वार्षिक उत्पन्नाचे वाढते प्रमाण, बाजारात सहज उपलब्ध असलेली विविध प्रकारची आकर्षक पॅकिंगची अनेकविध उत्पादने त्याबरोबरच टीव्हीवरील जाहिराती या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम. सर्व कारणांमुळे त्यांची उपयोगिता आपल्या जीवनात आवश्‍यक वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com