भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता  

thousand of people gather for funeral of  hooligan
thousand of people gather for funeral of hooligan

नागपूर : उपराजधानीतील सर्वात मोठा जुगार अड्डा संचालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याचा ५ ते ६ आरोपींनी पाठलाग करून कारमधून खेचून धारदार शस्त्रांनी खून केला. ही थरारक घटना शहरातील बोले पेट्रोल पंपसमोर घडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावत आरोपींना अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली. कुख्यात गुंड बिनेकरच्या अंत्यसंस्काराला मात्र हजारोंची गर्दी उसळली होती. 

बाल्या बिनेकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्याकांड, अपहरण करणे, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, जुगार भरवणे असे जवळपास २२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मात्र अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी झाली त्यामुळे पोलिसांनाहे बंदोबस्तात वाढ करावी लागली.  

बाल्यावर आरोपी करत होता रेकी 

मुख्य आरोपी चेतन हजारे याचे वडील सुनील हजारेचा २००१ मध्ये बाल्या बिनेकरने खून केला होता. त्यावेळी चेतन हा केवळ १५ वर्षाचा होता. काही वर्षातच चेतन हा गुन्हेगारी जगतात आला. त्याने जम बसविताच बाल्याचा खून करून बापाच्या हत्याकांडाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्याने गेल्या काही महिन्यापासून बाल्याची रेकी करीत होता. 

पिस्तूल झाली जाम 

शेवटी त्याला संपविण्यासाठी शनिवार दिवस ठरविला. शनिवारी दुपारी चार वाजता बोले पेट्रोल पम्पजवळील सिग्नलवर चेतनने आपल्या सहा साथीदारांसह बाल्याला अडविले. त्याच्यावर आरोपींनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल जाम झाल्याने गोळी चालली नाही. त्यामुळे घटनास्थळावर माऊजरची मॅगजीन पडली होती. 

आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून बाल्या बिनेकरचा खून केला. हत्याकांडानंतर दोन तासातच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात युनीट क्र. १ चे पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर, हवालदार प्रकाश वानखडे, दत्ता बागूल, नरेश सहारे, आशिष देवरे, अरूण चहांदे, राहूल इंगोले आणि मंगेश मडावी यांनी हत्याकांडातील आरोपी आसिम विजय लुडेरकर या आरोपीला अटक केली. त्याला खाक्या दाखवताच त्याने अन्य आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली.

बाल्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी

बाल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्यसंस्कारात हजारो युवक सहभागी झाले होते. त्यामुळे माहोल गरम झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बाल्याच्या अंत्यसंस्काराचेही व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.

गॅंगवार भडकण्याची चिन्हे

बाल्याचा गुन्हेगारी जगतात माठा दबदबा होता. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तसेच तो शहरातील सर्वात मोठा जुगार अड्डा माफिया होता. बाल्याचा गेम झाल्यामुळे त्याच्या टोळीतील समर्थक चिडले आहेत. त्यामुळे चेतनच्या टोळीशी त्यांचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत प्रतिस्पर्धी टोळीतील गेम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com