अरे, चिल्लर घेता का कुणी चिल्लर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

आज बॅंकाही चिल्लर घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे चिल्लर घेता का कुणी चिल्लर, अशी विनवणी करण्याशिावाय ग्राहकांकडे पर्याय नाही.

उमरेड (जि.नागपूर)  : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला भारतीय रुपयाच आता डोकेदुखीचे कारण ठरतोय. शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडे लाखो रुपये जमा झाले. यामध्ये नाणी ज्यामध्ये विशेषतः एक व दोन रुपयांच्या नाण्यांच्या समावेश आहे. याशिवाय पाच व दहाचीसुद्धा नाणी प्रचंड प्रमाणात जमा झालेली पाहावयास मिळतात. आज बॅंकाही चिल्लर घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे चिल्लर घेता का कुणी चिल्लर, अशी विनवणी करण्याशिावाय ग्राहकांकडे पर्याय नाही.
 

अधिक वाचा  : नागपूर  : तीन बचत गटांचे कंत्राट रद्‌द

बाजारपेठेत लाखो रुपयांची नाणी जमा
व्यापाऱ्यांकडे जमा असलेली नाणी बॅंका स्वीकारण्यास मनाई करीत असल्यामुळे चिल्लरचा महापूर आलेला दिसतो. चिल्लरचा वाढता साठा व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखीचे कारण ठरताना पाहायला मिळते. पूर्वी काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत व्यवहारांमध्ये नाण्यांचा तुटवडा जाणवायचा. तेव्हा काही लोक त्याचा फायदा घेत शेकडा दहा रुपये याप्रमाणे व्यापाऱ्यांना चिल्लरचा पुरवठा करायचे. असा प्रकार सर्वत्रच चालायचा. तेव्हा सरकारच्या वतीने बॅंकांमध्ये मोठ्‌या प्रमाणात चिल्लरचे वितरण करण्यात आले आणि सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळेसुद्धा अनेकांनी त्यांच्याकडे जमा असलेली चिल्लर बाजारात, व्यवहारात आणली.

अधिक वाचा  : दोन नाहीतर काहीच नाही; राष्ट्रवादीची भूमिका

बॅंकांचाही घेण्यास नकार
याशिवाय शहरी भागात खरेदी व व्यवहारासाठी मोठ्‌या प्रमाणात "प्लास्टिक मनी' अर्थात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड व ऑनलाइन शॉपिंगच्या वापरामुळेसुद्धा ग्रामीण भागात चिल्लर जमा झाली असल्याचे अनेक व्यापारी सांगतात. स्थानिक राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकारी पतसंस्थांनी व्यापाऱ्यांकडे जमा असलेली नाणी स्वीकारावीत अशा उपाययोजना शासनाच्या विविध राबविण्यात याव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why take a chiller?