दोन नाही तर काहीच नाही, राष्ट्रवादीची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आता कॉंग्रेसपुढे सभापतींचे आव्हान आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, राष्ट्रवादीनेसुद्धा दोन सभापतिपदांची मागणी केली आहे. यात एक खुल्या गटातील आणि एक महिला गटातील विषय समिती सभापती अशा दोन पदांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत मंत्री सुनील केदार यांच्या गटाची सरशी झाली आहे.

नागपूर  : निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षपद देण्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन सभापतिपदे देण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला आहे. मात्र, कॉंग्रेस एकच पद देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दोन पदे न मिळाल्यास एकही पद न घेण्याची मानसिकता राष्ट्रवादीची असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सभापतिपदांच्या वाटपाची चर्चा फिसकटल्यास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

अवश्य वाचा  - मैत्रीणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन निघाल्या तलवारी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आता कॉंग्रेसपुढे सभापतींचे आव्हान आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, राष्ट्रवादीनेसुद्धा दोन सभापतिपदांची मागणी केली आहे. यात एक खुल्या गटातील आणि एक महिला गटातील विषय समिती सभापती अशा दोन पदांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत मंत्री सुनील केदार यांच्या गटाची सरशी झाली आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे गटालाही एक पद हवे आहे. यात शांता कुंमरे, नाना कंभाले, शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले तापेश्‍वर वैद्य, कैलास राऊत यांचा समावेश आहे. त्याच वेळी कॉंग्रेसमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या, मात्र आपापल्या क्षेत्रात उत्तम प्रभाव असलेल्यांनाही सभापतिपदाची आशा आहे. यात सर्वाधिक मते घेणाऱ्या अवंतिका लेकुरवाळे, सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आलेल्या मुक्ता कोकड्डे आणि शंकर डडमल यांचाही समावेश आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करताना सुनील केदार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने उपाध्यक्षासाठी अर्ज भरून तो मागे घेतला. मात्र, त्यासाठी दोन सभापतिपदांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने ठेवला होता. यावर कॉंग्रेसने सकारात्मक भूमिका घेतली होती. तरीसुद्धा सुरुवातीला कॉंग्रेसने एकाच सभापतिपदाचा प्रस्ताव राष्ट्रवादीपुढे ठेवला होता. तसेच इतर नेत्यांच्या गटातील सदस्यांना सभापतिपद मिळतील, अशी अपेक्षा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nothing but two, the role of a nationalist