उपचारासाठी जात असलेल्या दाम्पत्याचा अपघात; पत्नी जागीच गतप्राण

Wednesday, 7 October 2020

सुवर्णा ह्या पती अश्विन डोमाजी हुमने (४५) याच्यासोबत त्यांच्या (एमएच ३५ एफएम २९७४) क्रमांकाच्या दुचाकीने एमआयडीसी परिसरातील एका दवाखान्यात उपचारार्थ चालले होते.

नागपूर  : भरधाव बोलेरोच्या धडकेत झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.  सुवर्णा अश्विन हुमने (वय ३५) रा. गौतमनगर असे मृत महिलेचे नाव आहे. 

मंगळवारी दुपारी २.१५ च्या सुमारास सुवर्णा ह्या पती अश्विन डोमाजी हुमने (४५) याच्यासोबत त्यांच्या (एमएच ३५ एफएम २९७४) क्रमांकाच्या दुचाकीने एमआयडीसी परिसरातील एका दवाखान्यात उपचारार्थ चालले होते. त्यावेळी एमआयडीसी परिसरातील अमेरिकन हॉस्पिटल पुढे हुमने यांच्या दुचाकीमागून आलेल्या भरधाव बोलेरो पिकअप व्हॅनच्या आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने चालवीत हुमनेंच्या दुचाकीला धडक दिली. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
 

या धडकेत हुमने पती पत्नी दुचाकीवरून खाली पडले. यात हुमनेंच्या पत्नी सुवर्णा हिला छातीला व खांद्याला जबर मार लागला. दरम्यान त्यांना उपचारार्थ लता मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife killed, husband injured in Bolero collision