कोरोनाबाबत ‘विकिपिडिया`मध्ये ‘बीग बी`वर ताशेरे !

Wikipedia about Corona targeted at Big B
Wikipedia about Corona targeted at Big B

नागपूर : राज्यातील कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत माहितीचा खजिना असलेल्या विकिपिडियामध्ये बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहे. बच्चन यांनी कोरोना विषाणूबाबत अफवा पसरविल्याने ते सोशल मिडियावर ट्रोल झाले होते. याचा उल्लेख करीत विकिपिडियामध्ये बच्चन यांना चुकीची माहिती पसरविणाऱ्यांच्या रांगेत बसविण्यात आले. 

‘२०२० मध्ये महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा उद्रेक' या नावाने राज्यातील कोरोना स्थितीबाबत विकिपिडिया तयार करण्यात आला आहे. यात कोरोना विषाणूच्या आगमनापासून तर ऑगस्टपर्यंतच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना, प्रयोगशाळा, चाचण्यांचा प्रकार सर्व माहिती या विकिपिडियावर उपलब्ध आहे.  राज्य सरकारच्या आकडेवारीचा उल्लेखही यात करण्यात आला आहे.

राज्यात कुठून, कसा कोरोनाचा प्रसार झाला. पहिला रुग्ण कुठे आढळला? याबाबतही माहिती उपलब्ध आहे. याच काळात टाळी वाजविण्याचा उपक्रमही देशभर राबविण्यात आला. महाराष्ट्रही यास अपवाद नव्हते. याच थाळी वाजविल्यावरून बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘लोकांनी शंखनाद करीत टाळी वाजविल्याने कोरोना विषाणूची मारक क्षमता कमी झाली`, अशी एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केली होती.

या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले होते. नेटकऱ्यांनी केलेल्‍या टिकेमुळे अमिताभ बच्चन यांना ही पोस्ट सोशल मिडियावरून डिलिट करावी लागली होती, असे विकिपिडियामध्ये नमूद आहे. बच्चन यांना अफवा पसरविणाऱ्यांच्या पंक्तीत बसविण्यात आले आहे.

विकिपिडियावर ‘अफवा व चुकीची माहिती` असा एक कॉलम असून त्यात बच्चन यांच्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. ती वेळ निघून गेली असली तरी विकिपिडियाच्या माध्यमातून लिखित स्वरुपात बच्चन यांनी अफवा पसरविल्याची माहिती कायम राहणार आहे. या विकिपिडियामध्ये मे महिन्यांपर्यंत प्रत्येक शहराची आकडेवारीही देण्यात आली आहे.
 
खोडसाळपणाचा कळस
कोरोना रोखण्यासाठी शेण, गोमुत्राचे सेवन करावे, असे खोडसाळपणाचा कळस गाठणारे संदेशही त्या काळात पसरविण्यात आले होते. त्या काळात असे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com