विजय वडेट्टीवार म्हणतात, "महाज्योतीला देणार पूर्ण वेळ अधिकारी आणि स्वायत्त संस्थेचा दर्जा 

टीम ई सकाळ 
Sunday, 8 November 2020

सकाळमध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, प्रदीप डांगे यांची व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ करण्यात आले.

नागपूर : महाज्योतीला पूर्ण वेळ अधिकारी देणार असून स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या संस्थेला पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारीवर काम सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. 

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

सकाळमध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, प्रदीप डांगे यांची व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ करण्यात आले. त्यांच्याचकडे याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. लवकरच महाज्योतीला पूर्ण अधिकारी मिळणार आहे. तशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. ५० कोटींचा निधी मिळाला असून जादा निधीची मागणी करण्यात आली. 

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

बार्टी, सारथीच्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना दीड वर्षापूर्वी करण्यात आली. ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 

क्लिक करा- आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून 

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी याची स्थापना करण्यात आली. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले नाही. याचे मुख्यालय नागपूर येथे स्थापित करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will give Full time officer to Mahajyoti said Vijay Wadettiwar