सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल 

टीम ई सकाळ 
Sunday, 8 November 2020

आपण बाजारातून औषधं आणून वेळ निभावून नेतो. मात्र आता चिंता करू नका. तुमच्या आहारामध्ये काही बदल करून तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्तता मिळवू शकणार आहात.  

नागपूर: नेहमीची दगदग, काम, टेन्शन या गोष्टींमुळे मानवी शरीरावर सतत काही ना काही परिणाम होत असतात. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी यांसारखे विकार काही नवीन नाहीत पण हे विकार जास्त झाल्यास आपण डॉक्टरांकडे जातोच. मात्र अजून एक विकार असा आहे जो या जगातील प्रत्येक व्यक्तीला सतत होत असतो. तो विकार म्हणजे छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिडिटी. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा जेवणाच्या वेळेत बदल झाल्यामुळे नेहमीच आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. मात्र यासाठी आपण बाजारातून औषधं आणून वेळ निभावून नेतो. मात्र आता चिंता करू नका. तुमच्या आहारामध्ये काही बदल करून तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्तता मिळवू शकणार आहात.   

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

समतोल आहार –

आपण आपल्या जेवणामध्ये असा समतोल असा आहार घ्यावा की ज्यामुळे छातीत जळजळ होणार नाही. म्हणजे वरण-भात-भाजी-पोळी यासोबत सलाड देखील खावे. यामुळे आपल्या छातीत जळजळ ही होणार नाही. एकूण जेवणाच्या ८० टक्के जेवण करावे. त्यामुळे आपण समतोल आहार घेऊ शकता आणि छातीत जळजळ होणार नाही. आपल्याला भूक लागल्यावर भरपूर आपण जेवतो. असे केल्याने अन्नपचन होत नाही आणि ॲसिडिटीची समस्या किंवा छातीत जळजळ व्हायला लागते. त्यामुळे समतोल आहार घ्यावा.

खाण्यावर लक्ष ठेवावे –

जर आपल्याला एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होत असेल तर असा कोणता पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जळजळ होते हे कायम लक्षात ठेवावे आणि असा पदार्थ आपण खाण्यास वर्ज्य करावा. जेणेकरून आपल्या छातीत जळजळ होणार नाही. अनेकदा आपल्याला लक्षात येत नाही की कुठला पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जळजळ होते. मात्र, आपण बारीक लक्ष ठेवून असा पदार्थ खाणे टाळावे. आपल्या छातीत जळजळ होणार नाही.

मसालेदार पदार्थ –

जेवणामध्ये मसालेदार पदार्थांचे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी समस्या, छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सात्विक जेवण हे नेहमी करावे. ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणार नाही किंवा छातीत जळजळ होणार नाही. मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ नेहमीच आपल्या जेवणात टाळावेत.

तणाव –

अनेकदा विनाकारण आपण कुठल्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने देखील आपल्या छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे आपल्याला पुढील आजाराचा धोका ओळखून असा तणाव घेणे टाळावे. तणाव देखील आजारच असल्याचे सांगण्यात येते. तणाव घेतल्याने आपल्या छातीत जळजळ ही समस्याही होऊ शकते, असे देखील डॉक्टर लोक सांगतात.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता...

मद्यपान –

जर आपल्याला मद्यपानाची सवय असेल तर हे तातडीने थांबवावे. ज्या लोकांचे मद्यपान मोठ्या प्रमाणात असते त्यांची भूक ही मंदावते आणि ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि आपल्या छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे मद्यपान करणे थांबवावे आणि आपण छातीत जळजळ होणार नाही याची काळजी घ्यावी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do this remedies and get rid of Acidity instantly