बघा, बघा बिना-भानेगाव पुनर्वसनाविनाच ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

भानेगाव, बिना ओपनकास्ट कोळसा खाणीकरिता प्रकल्पग्रस्तांच्या शेती वेकोलिने अधिग्रहित करून ताब्यात घेतल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पुनर्वसनाचे प्रकरण प्रलंबित होते. मात्र प्रकल्पग्रस्तांनी शेती वेकोलिला दिल्याने 
शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला. काहींना नोकरीही मिळाली.

खापरखेडा (जि.नागपूर) : परिसरातील सावनेर तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असलेले भानेगाव तर कामठी तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बिना गावाचे पुनर्वसन कधी होणार, हे गुलदस्त्यात असून भानेगाव, बिना प्रकल्पग्रस्तांचे या प्रश्‍नाकडे लक्ष लागले आहे. 

क्‍लिक करा:  वाघ साहेबांना आता कृत्रिम पाय 

वेकोलि प्रशासनाच्या फाइल धूळखात 
भानेगाव, बिना ओपनकास्ट कोळसा खाणीकरिता प्रकल्पग्रस्तांच्या शेती वेकोलिने अधिग्रहित करून ताब्यात घेतल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पुनर्वसनाचे प्रकरण प्रलंबित होते. मात्र प्रकल्पग्रस्तांनी शेती वेकोलिला दिल्याने 
शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला. काहींना नोकरीही मिळाली. मात्र काही प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नसून ते तांत्रिक अडचणीत सापडले आहे. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्रोसेसमध्येसुद्धा आहे. पण वेकोलि प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी भानेगाव, बिनाचे पुनर्वसन व्हावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. कारण गावालगतच कोळसा खाणी आल्याने डम्पिंगदरम्यान भूकंपासारखे झटके झाल्यासारखा भास होत असतो. त्यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्‍यता बळावली आहे, असे ग्रामस्थ बोलू लागले आहेत. शिवाय मागील अनेक दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले होते. कालांतराने माजी पालकमंत्र्यांनी याची दखल घेत प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा केला. शासनाचे परिपत्रकसुद्धा निर्गमित करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण संचारले होते. शिवाय पुनर्वसन मंजुरी मिळाल्यानंतर माजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे आभार मानले होते. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या गावांच्या पुनर्वसनासाठी जागा अद्यापही निश्‍चित झाली नसल्याचा सवाल नागरिक करू लागले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बिना गावाची संपूर्ण पुनर्वसन जबाबदारी वेकोलि प्रशासनाची असल्यामुळे एजन्सी म्हणून केले तर पुनर्वसनासाठी लागणारा निधी जास्त असल्यामुळे प्रकल्प जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. शिवाय एवढेच नव्हे तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. बिना संगम, भानेगाव पुनर्वसनासाठी प्रशासन कासवगतीने काम करीत असल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस वेकोलिचे उत्पादन वाढीस असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागावा, याकडे लक्ष लागले आहे. 

क्‍लिक करा:  सोने लपविण्याची नवी शक्‍कल, नया जमाना, नयी सोच 

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र 
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित भानेगाव ग्रामपंचायतीला पुनर्वसनासाठी नागरी सुविधा कोणकोणत्या असाव्या, यासाठी माहितीकरिता पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा 
आम्ही ग्रा.पं.च्या वतीने संबंधित वेकोलि प्रशासनाला जुने भानेगावच्या पुनर्वसनाकरिता पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आले असल्याचे सांगितले. 
रवींद्र चिखले, सरपंच, भानेगाव  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without rehabilitating Bhanegaon!