कौटुंबिक कलहातून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

त्यांच्या घरात काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण पेटायचे. शेवटी वाद विकोपाला गेला. 

नागपूर : अनेक दिवसांपासून घरात सर्वकाही सुरळीत नव्हते. कुठल्या तरी कारणावरून रोज वादाची ठिणगी पडायची. हा वाद दिवसागणिक वाढतच गेला. शेवटी विवाहितेने टोकाचा निर्णय घेतला. 

महिलेचे पती प्रणीत हे एका खासगी कंपनीसाठी मार्केटिंगची नोकरी करतात. त्यांचा प्रियंकाशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या घरात काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण पेटायचे. शेवटी वाद विकोपाला गेला. 

हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

शनिवारी प्रियंकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध पडल्यानंतर ही बाब पतीच्या लक्षात आली. त्यांनी लगेच तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रियंकाचा रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ही घटना पारडी परिसरात रविवारी उघडकीस आली. प्रियंका प्रणीत नाईक (वय 27, विनोबा भावे नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman commits suicide