किती हा दरारा, पती रागावतील म्हणून महिलेने मुलांसह घेतली तलावात उडी

अनिल कांबळे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पती रागावतील या भीतीपोटी महिलेने दोन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन युवकांनी तलावात उडी घेत त्यांच जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला. 

नागपूर : प्रत्येकाला शेजारी असतातच. अडचणीच्या वेळेत नातेवाईकांच्या अगोदर शेजारीच मदतीला धावून येतात. त्यामुळे शेजाऱ्यांची सर्वांनाच गरज भासत असते. मात्र, काही शेजारी चांगले नसतात. त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या कारनावरून वाद होत असतो. शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे मारहाण, पोलिस ठाण्यात तक्रार झाल्याचे अनेकांनी बघितले आणि ऐकले असेलच. मात्र, शेजाऱ्यांशी भांडण झाल्याने महिलेने चक्‍क तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय महिला गिट्टीखदान भागात राहते. गुरुवारी रात्री शेजाऱ्याने तिच्यासोबत वाद घातला. हा वाद पतीला कळल्यानंतर रागावतील, अशी भीती महिलेला होती. काय कराव काय नाही याच विचारात ती होती. त्यामुळे ती 11 वर्षीय मुलगा व सात वर्षीय मुलीसह फुटाळा तलाव येथे आली. मुलांसह तिने थेट तलावात उडी घेतली. 

उघडून तर बघा - पत्नीसह चाट खात होता पोलिस, टेबलवर दिसली ही जीवघेणी वस्तू... मग

तलावात उडी घेताच मुलांनी आरडाओरड केली. तिथे उपस्थित दोन युवकांनी लगेच तलावात उडी घेत महिला व तिच्या मुलांना बाहेर काढले. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. महिला व मुले थंडीत कुडकुडत होती. शाहू यांनी महिला व मुलांना शाल दिली. त्यानंतर तिघांना घेऊन शाहू या गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गेल्या. तेथे महिलेची समजूत घालण्यात आली. 

पुन्हा असे कृत्य करणार नाही

शेजाऱ्यासोबत झालेल्या वादामुळे पती रागावतील या भीतीने महिलेने दोन अपत्यांसह फुटाळा तलाव गाठले व उडी घेतली. मुलांनी आरडाओरड केल्याने दोन युवकांनी उडी घेत तिघांनाही वाचवले. या घटनेनंतर महिला पोलिस उपायुक्‍त विनीता साहू यांनी महत्त्वाची भूमिका निभावत महिलेचे समुपदेशन केले. महिलेने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली दिली. महिलेने विनीता साहू यांच्या खांद्यावर डोके ठेवून हुंदके देत माफी मागत पुन्हा असे कृत्य करणार नाही, अशी ग्वाही दिली.

ठळक बातमी - तुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी

रविवारी युवकांचा सत्कार

फुटाळा तलावावर महिला दोन मुलांसह आली. यानंतर तिने थेट तलावात उडी घेतली. दोन्ही मुलांनी आरडाओरड केल्याने अमोल चकोले व अरविंद बघेल या दोन युवकांनी तलावात उडी घेत तिघांनाही वाचवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रजासत्ताकदिनी रविवारी (ता. 26) दोन्ही युवकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman jumped into the lake with her children

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: